शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकट; आयजी विवेक रानडे दीड तास सैलानी यात्रेत तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 11:31 IST

सैलानी यात्रेत सध्या असलेल्या भाविकांना पोलिसांच्या सहकार्यातून त्यांच्या गावी परत पाठविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

बुलडाणा: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे आयजी विवेक रानडे यांनी सैलानी येथे यात्रा महोत्सवाच्या ठिकाणाची पाहणी करून अधिकाºयांशी तेथेच बैठक घेतली. दरम्यान, सध्या ते बुलडाणा येथे दाखल झाले असून, त्यांच्या या तातडीच्या भेटीचे नेमके गमक स्पष्ट होऊ शकले नाही. कोरोना संकटामुळे सैलानी यात्रा महोत्सव प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाºयांनी रद्द केला आहे. त्यामुळे सैलानी यात्रेत सध्या असलेल्या भाविकांना पोलिसांच्या सहकार्यातून त्यांच्या गावी परत पाठविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या संदर्भाने ही भेट असण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सैलानी यात्रा महाराष्ट्रासह तेलंगणा, आंधप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानमध्येही प्रसिद्ध आहे. या सर्व भागातून जवळपास ८ लाखावर भाविक दरवर्षी यात्रेत येतात. देशात कोरोनाचे २८ संशयित रुग्ण पाहता कोरोनाचे संक्रमण टाळण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सैलानी यात्रेतील कोरोना व्हायरसचा धोका पाहता जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे.  शुक्रवारी सकाळी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी १० पथकांची बैठक घेतली. ही पथके सैलानीत जाऊन भाविकांना परत पाठविण्यासाठी काम करणार आहे. तसेच  मंडळ अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारीसुद्धा मदत करणार आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले रायपूर पोलिस स्टेशनमध्ये बैठक  घेऊन आवश्यक त्या सूचना देणार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना