कोरोनामुळे पाणी विक्री घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:34+5:302021-05-18T04:35:34+5:30

कर वसुलीसह कोरोना जनजागृती ! बुलडाणा : जिल्ह्यातील नगरपालिकांकडून १०० टक्के कर वसुलीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोनाची ...

Corona caused water sales to decline | कोरोनामुळे पाणी विक्री घटली

कोरोनामुळे पाणी विक्री घटली

Next

कर वसुलीसह कोरोना जनजागृती !

बुलडाणा : जिल्ह्यातील नगरपालिकांकडून १०० टक्के कर वसुलीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोनाची भीती नागरिकांमध्ये असल्याने पालिका कर्मचारी कर वसुली सोबतच कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत.

पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची गरज

किनगावराजा : हिवरखेड ते बारलिंगा हा गावाकडील पाणंद रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बारलिंगा, खैरव, टाकरखेड येथून येणारे बरेच नागरिक या रस्त्याने किनगावराजाकडे बाजारपेठेसाठी येत असतात. रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांसह या सर्व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

लाभार्थ्यांना मोफत धान्याची प्रतीक्षा

जानेफळ: लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब जनतेची गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर होऊन १५ दिवसांचा कालावधी होत असला तरी अद्यापपर्यंत मोफत धान्य पोहोचले नाही.

उन्हाळी कोथिंबीर बहरली

किनगाव जट्टू: कोथिंबिरीची लागवड ही कोणत्याही हवामानात करू शकतो, परंतु अति पाऊस किंवा अति ऊन असेल, तर कोथिंबिरीची वाढ हवी तशी होत नाही. उन्हाळ्यात कोथिंबिरीची वाढ कमी असते; पण मागणी जास्त असल्याने बाजारात भाव चांगला असतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काेथिंबीरची लागवड केली आहे़

दुर्गा टेकडी देते नैसर्गिक ऑक्सिजन

लोणार : कोरोनामुळे सध्या सर्वत्र ऑक्सिजनसाठी धडपड सुरू आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व त्यामुळे समोर येत आहे. लोणार येथील दुर्गा टेकडीवर समाजसेवक पुंडलिक मापारी यांनी स्वत: ५० हजार झाडे जगविली आहेत. त्यामुळे हा परिसर सध्या नैसर्गिक ऑक्सिजन देत असून, त्याचे महत्त्व वाढले आहे.

विद्युत पुरवठा नसल्याने शेतकरी अडचणीत

डोणगाव : येथील राजू नारायण आखाडे, गजानन नारायण आखाडे यांनी २२ जून २०१७ रोजी दोन कोटेशन भरूनही त्यांना आजपर्यंत विद्युत जोडणी मिळालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़

कांदा बीजोत्पादन काढणीला वेग

मेहकर : रब्बी हंगामात हिवरा आश्रम शिवारात प्रगतशील शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कांदा लागवड केली आहे. अनेकांचा कांदा बीजोत्पादन काढणीला आलेला आहे. तालुक्यातील कोराडी प्रकल्प शंभर टक्के भरला होता. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून आले.

सिमेंट दरवाढीचा बांधकामाला फटका

बुलडाणा : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.

मिरचीचा उन्हाळी हंगाम सुरू

धामणगाव धाड : परिसर मिरचीचे माहेरघर म्हणून ओळखला जाताे़ मागील वर्षी पडलेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्प, तसेच विहिरीत मुबलक पाणी साठा असल्याने शेतकरी ठिबक सिंचनाद्वारे मिरचीचे पीक घेतात. सध्या परिसरात मिरची पिकाची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे.

शेतमाल व्यापाऱ्यांना शिथिलता द्या!

धामणगाव बढे : कोरोनाच्या वाढत्या संकटामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, तोंडावर आलेल्या पावसाळ्यात शेतीची मशागत करताना, बियाणाची व खतांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मात्र दमछाक होत आहे.

साेनाेशी ग्रा.पं.च्यावतीने मास्कचे वाटप

दुसरबीड : सोनोशी येथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने ग्रामस्थांना मास्क आणि सॅनिटायरझचे वितरण करण्यात आले़ गावातील लोकांचे स्वास्थ्य अबाधित राहावे, काेविडसारख्या महामारीपासून ग्रामस्थांचे रक्षण केले जावे, महामारीसारख्या दुर्धर आजाराला रोखण्याकरिता गावकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा हेतू समोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला़

व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

किनगाव जट्टू : गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग आजाराने कहर केल्यामुळे शासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन जाहीर केला होता़ त्यामध्ये धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी होती़ त्याचा फटका लग्नसमारंभावरसुद्धा बसल्याने लग्न समारंभाशी निगडित बँड पथक, फोटोग्राफी, मंगल कार्यालय, फुले व्यवसाय, घोडेवाले इत्यादी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़

Web Title: Corona caused water sales to decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.