शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

CoranaVirus : प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोना बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 10:10 IST

निमखेड येथील  एक प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

बुलडाणा: देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड येथील  एक प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांनाही आता  २७ मे रोजी सकाळी बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. हा पोलिस  प्रशिक्षणार्थी २० मे रोजी बुलडाणा जिल्ह्यात आला होता.मुंबई येथे कोरोना संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची एक तुकडी राखीव ठेवण्यात आली होती. या तुकडीमध्ये हा पोलिस प्रशिक्षणार्थी होता. दरम्यान, नंतर  त्यांना परत पाठविण्यात आले  होते. परतीच्या प्रवासात या कर्मचाºयाचा लातूर येथील त्याच्या सहकाºयाशी निकटचा संपर्क आला होता. आणि लातूरचा त्याचा सहकारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे निमखेड येथे २० मे रोजी पोहोचल्यानंतर या पोलिस कर्मचाºयाने स्वत:ला शेतातच विलगीकरण करून घेतले होते. दरम्यान, आरोग्य विभागाला याची माहिती लातूर येथून मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने या पोलिस कर्मचाºयाशी संपर्क साधून त्यास २१ मे रोजी बुलडाणा येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल केले. २७ मे रोजी या पोलिस कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा देऊळगाव राजाचे आरोग्य पथक हे निमखेड येथे सकाळी पोहोचले असून तेथून त्याच्या संपर्कातील सहा जणांना  तपासणीसाठी बुलडाणा येथे या पथकाने पाठविले आहे.

सुरक्षीततेबाबत घेतली खबरदारीया प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाºयाने सुरक्षीततेबाबत संपूर्ण खबरदारी घेतली होती. आपला लातूर येथील सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पोलिस कर्मचाºयाने स्वत:स विलग करून घेतले होते. कौटुंबिक पातळीवरही त्याने सुरक्षीत अंतर राखले  होते. त्यामुळे त्याच्या पासून अन्य कोणाला फारसे संक्रमण होण्याचा धोका नसल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. सोबतच या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये फारसे व्यक्ती नसून खबरदारी म्हणून निमखेड येथील सहा जणांना आरोग्य तपासणीसाठी बुलडाणा येथे पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या