शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब घेतल्यानंतर संदिग्ध रुग्णांचा अनेकांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:17 IST

व्यक्ती या नियमाचे पालन करतो की नाही यावर पाळत ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा व्यक्ती व कोरोना बाधित्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना अहवाल येईपर्यंत कोविड सेंटरमध्येच क्वॉंरंटीन केल्या जात असे. परंतु आता स्वॅब घेतल्यानंतर त्या व्यक्तींना घरीच कॉंरंटीन होण्यासाठी सांगितले जाते. संबंधित व्यक्ती या नियमाचे पालन करतो की नाही यावर पाळत ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. दोन-तीन दिवसानंतर जेव्हा संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. तेव्हा त्यांना बोलावून कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. परंतु त्या दोन तीन दिवसात तो व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येतो. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे.ग्रामीण भागासह जळगाव शहरातील कोरोना बाधितांची संख्या सारखी वाढत असल्याने जनजीवन चिंताग्रस्त बनले आहे. नियमांचे पालन नागरिकांकडून केल्या जात नसून प्रशासन सुद्धा याबाबत हतबल ठरत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे चार व ग्रामीण रुग्णालयाचा एक असे पाच डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.जळगाव तालुक्याची कोरोना बाधितांची संख्या २७९ झाली आहे. आता कंटेनमेंट झोन करणे बंद झाले. तसेच ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तो भाग दररोज सॅनीटाईस करणे व त्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत नाही. सध्या ८० अ‍ॅक्टीव्ह रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत.त्यांना कोरोनाची फारशी लक्षणे नसल्याने ते कोरोनावर मात करून घरी परततील अशी आशा आहे. परंतु दररोज वाढत चाललेली कोरोना बाधितांची संख्या हा तालुक्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदcorona virusकोरोना वायरस बातम्या