शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कातील सहा जण देऊळगाव राजात ‘होम क्वारंटीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:25 IST

दोन डॉक्टरांच्या संपर्कात देऊळगाव राजातील सहा जण आले होते.

देऊळगाव राजा: जालना येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या  दोन डॉक्टरांच्या संपर्कात देऊळगाव राजातील सहा जण आले होते. त्या सहा जणांना देऊळगाव राजा येथे होम क्वारंटीन करण्यात आले आहे. त्यातील तीन रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. देऊळगाव राजा पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जालना शहरात अनेक रुग्ण उपचारासाठी ठराविक डॉक्टरांकडे नियमित जातात. सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून जालना शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे. मागील चार दिवसापूर्वी जालना शहरातील दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. जालना आरोग्य विभागाने त्या दोन डॉक्टरांनी तपासणी व उपचार केलेल्या रुग्णांची माहिती मिळवली, त्यामध्ये देऊळगाव राजा शहरातील सहा जणांचा समावेश आहे. जालना जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती कळवल्यानंतर देऊळगाव राजा शहरातील विविध भागात राहणाºया त्या सहा जणांशी स्थानिक आरोग्य विभागाने संपर्क साधून त्यांना होम क्वारंटीन केले. या सहा जणांमध्ये तीन रुग्ण गंभीर आजाराचे असुन त्यांचा समावेश हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आरोग्य विभागाने केला आहे. इतर तीन रुग्ण लो रिस्क संपर्कातील आहेत, त्यांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे. जालन्यात दोन डॉक्टर पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती मिळाल्याने या सहा रुग्णांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक आरोग्य विभागाकडे सुध्दा संपर्क केला होता, अशी माहिती समोर येत आहे. देऊळगाव राजा शहरात यापूर्वीही   दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते त्यापैकी एक रुग्ण हा राजस्थान येथुन परतला होता, तो पॉझिटिव्ह झाल्याने त्याला मलकापूर येथून आणण्यासाठी गेलेला वाहचालकही पॉझिटिव्ह आढळला होता. त्या दोघांवरही बुलडाण्यात उपचार झाले. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर देऊळगाव राजा कोरोनामुक्त झाले असतानाच परत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात शहरातील सहा जण आल्याने शहर वासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जालन्यातील डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या सहा रुग्णांपैकी तीन रुग्ण हायरिस्क संपर्कातील आहेत. त्यांना बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठवले जाणार असून तीन रुग्ण लो रीस्क मधील आहेत, त्यांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे.- डॉ. आसमा मुजावर, वैद्यकीय अधिकारी, देऊळगाव राजा

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याDeulgaon Rajaदेऊळगाव राजा