शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्याचे दर वाढले; घराचे बांधकाम झाले महाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 11:43 IST

Construction materials prices increased; वाळू, सिमेंट, सळई आणि विटांचे दर वाढल्याने बांधकामाचा खर्च दुप्पट वाढला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : वाळू, सिमेंट, सळई आणि विटांचे दर वाढल्याने बांधकामाचा खर्च दुप्पट वाढला आहे. शिवाय मजुरीतही मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम करणे अवघड झाले. लाकडाऊननंतर स्टीलच्या दरात जवळपास २५ टक्के वाढ झाली असून, वाळूचा दर दुप्पटीपेक्षाही वाढला आहे. तालुक्यासह शेगाव, संग्रामपूर तालुक्यातील काही नद्या व नाले मोठ्या प्रमाणात वाहतात. मात्र, खामगाव शहर व परिसरात मागील काही वर्षापासून वाळूचा दर अचानक वाढविण्यात आला. एकीकडे वाळू घाटांचा लिलाव रखडला आहे. परिणामी दरच निश्चित झाले नाहीत. त्यामुळे स्थानिकची वाळू ६ ते ७ हजार ब्रासप्रमाणे विक्री होत आहे. शिवाय, विटांचे भावही २० टक्क्यांनी वाढले असल्याने अनेकांचे बांधकाम बजेट कोलमडले आहे.वीटभट्टीसाठी लागणारा कच्चा माल माती, थर्मलहून येणारी राख महागली आहे. तसेच मजुरीही वाढली असल्याने उत्पादनाचा खर्च वाढला.  डिझेलच्या किंमती वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला असल्याने दरात १० ते १५ वाढ झाल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात आले. बांधकाम करणारे कारागीर, मजूर लॉकडाऊनमध्ये गावी परतले. यात परप्रांतीय मजुरांची संख्या लक्षणीय होती. घरकूल योजनेतून सुरू करण्यात आलेल्या बांधकामांना निधी अपुरा पडत असल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. अनेकांचे काम अर्ध्यावर थांबले आहे. बांधकामाचा खर्च वाढल्याने घरमालकांचे आर्थिक नियोजनही कोलमडले आहे. यासाठी आता काहींना कर्ज काढावे लागत आहे.

बांधकाम साहित्याचे दर का वाढले? n जिल्ह्यात नदीपात्रात वाळू असतानाही लिलाव झाले नाहीत. त्यामुळे चोरटी वाळू वाहतूक झाली, यात अनेकांची देवाणघेवाण असल्याने ग्राहकांना नाहकपणे जास्तीची रक्कम द्यावी लागत आहे.  n सध्या संग्रामपूर, शेगाव तालुक्यातून वाळू येत असून याच वाळूचा वापर गिलाव्यासाठी केला जात आहे. बांधकामासाठी दगडापासून तयार करण्यात येणारे क्रश वापरले जाते. त्या कृत्रिम वाळूचा भाव ३ हजार ५०० ते ४ हजार २०० ब्रास आहे.

लॉकडाऊन काळात बांधकामांची संख्या कमी होती. वाहतुकीची अडचण झाल्याने सिमेंट, सळईच्या दरात काही प्रमाणात दरवाढ झाली होती. दिवाळीनंतर सळईच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्याचा बांधकामावर परिणाम होत आहे.- असलम पटेलबांधकाम साहित्य विक्रेता 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव