शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यातच शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:28 IST

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत. 

ठळक मुद्देसरपंच पाटील यांच्या प्रयत्नातून लिहा बु. हगणदरीमुक्तीच्या वाटेवर! इतर गावांनी आदर्श घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत.  अजूनही लोकांना शौचालयाचे महत्त्व पटवून सांगावे लागते, ही शोकांतिकाच आहे; परंतु सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांच्यासारख्या पदाधिकार्‍यांनी ठरवल्यास  हे काम अशक्य नाही. स्वच्छता हा ग्रामविकासाचा कणा आहे, हे ओळखून सरपंचांनी यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्यामध्ये लाभार्थींच्या गृहभेटी घेणे, बैठका घेणे,  तसेच गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांना एकत्र करून या कामास गती देत आहेत. ४१९ कुटुंबांचे  हे मोठे गाव आहे. अद्याप २५४ एवढे शौचालये त्यांनी पूर्ण केले असून, ऑगस्टमध्ये शंभर या विक्रमी संख्येने त्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून घेतले. अजून त्यांच्याकडे १५४  शौचालये बांधकाम बाकी असून, येत्या महिनाभरात ते पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केलेले आहे. यासाठी त्यांना ग्रामसेवक शीतल गवळी यांचे विशेष सहकार्य लाभत असून, ईश्‍वर पाटील, अनिल हरगड, गजानन सपकाळ, यांचाही सक्रिय  सहभाग लाभत आहे. तसेच गावाच्या तलाठी मंदा राठोड यांचाही मोलाचा सहभाग लाभत आहे. इतर सरपंचांनीही यांचा आदर्श घ्यावा, असे आदर्शवत सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील या स्वच्छ भारत मिशनसाठी काम करीत आहेत. लवकरच त्या गाव हगणदरीमुक्त करून एक आदर्श निर्माण करतील, याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

इतर गावांनी आदर्श घेण्याची गरजमोताळा तालुक्यातील लिहा बु. येथील ग्रामस्थांनी एका महिन्यात शंभर शौचालयांचे बांधकाम करण्याचा विक्रम केल्यामुळे परिसरात हगणदरीमुक्त गावाची चळवळ वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लिहा बु. गावाचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्ह्यातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घेऊन आपले गाव हगणदरीमुक्त करून आदर्श गाव निर्माण करण्याचा चळवळीत भाग घेण्याची गरज आहे.