शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आयुष विभागाचे बांधकाम अनधिकृत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 13:57 IST

हे बांधकाम त्वरीत थांबविण्यासाठी वरिष्ठांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या उपअभियंत्यांना पत्र दिले आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रूग्णालयाच्या इमारतीवर आयुष विभागाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, आयुष इमारती करीता निवडलेली जागा चुकीची असल्याचा ठपका ठेवत, वैद्यकीय अधिक्षकांनी हे बांधकाम त्वरीत थांबविण्यासाठी वरिष्ठांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या उपअभियंत्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे पहिल्या माळ्यावर आयुष अंतर्गत इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु, प्रत्यक्षात आयुष इमारतीकरीता सामान्य रुग्णालय प्रशासनाने दाखविलेल्या जागेऐवजी रूग्णालयीन वाढीव वार्डाकरीता आरक्षीत जागेवर म्हणजेच सामान्य रूग्णालयाच्या छतावर बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वार्ड बांधण्याकरीता जागा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम करण्यात येत असलेल्या जागेची निवड करताना कोणालाही विचारात घेण्यात आले नसल्याचा ठपका वैद्यकीय अधिक्षकांनी ठेवला आहे. दरम्यान, सामान्य रूग्णालय प्रशासनाला चालू असलेल्या बांधकाम नकाशाची प्रतही देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेगाव येथील सामान्य रूग्णालयाच्या इमारतीवर सुरू असलेले बांधकाम अनधिकृत असल्याची बाब अधोरेखीत होत आहे. या पत्राच्या प्रतिलिपी जिल्हा शल्य चिकित्सकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा, उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत.

सुरू असलेले बांधकाम क्षेत्रफळापेक्षा कमी!सामन्य रूग्णालयाच्या इमारतीवर सुरू असलेले बांधकाम क्षेत्रफळापेक्षा कमी असल्याचेही वैद्यकी अधिक्षकांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. शिवाय जागा निवडीबाबत संबंधितांना विचारणा केली असता अभियंता नाईक यांनी अरेरावी केल्याचेही नमूद केले आहे.

रूग्णालयाच्या वीज आणि पाण्याचा वापर!बांधकाम सुरू असताना रूग्णालय प्रशासन अनभिज्ञ आहे. मात्र, बांधकामासाठी रूग्णालयाची वीज, पाणी वापरण्यात येत असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. या पत्रामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

सईबाई मोटे सामान्य रूग्णालय, शेगाव येथील इमारतीवरील बांधकाम थांबविण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. वैद्यकीय अधिक्षकांच्या पत्र प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल.- प्रेमचंद पंडितजिल्हा शल्य चिकित्सकबुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगाव