शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

समृद्धी महामार्गाला हजारो शेतक-यांची संमती

By admin | Updated: March 11, 2017 01:39 IST

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग; १ हजार १५0 हेक्टर जमीनीचे संमतीपत्र.

ब्रम्हानंद जाधव बुलडाणा, दि. १0- मुंबई- नागपूर या समृद्धी महामार्गामध्ये शेतकर्‍यांची हजारो एकर शेतजमीन जात असल्याने सुरूवातीला अनेक शेतकर्‍यांचा या महामार्गासाठी विरोध होता. मात्र, आता समृद्धी महामार्गासाठी शेतकरी संमती दर्शवत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५२ शेतकर्‍यांनी ११५0.४२ हेक्टर जमीनीचे समृद्धी महामार्गाकरिता संमतीपत्र दिले आहे. दळण- वळणाचा मार्ग सुकर करण्याबरोबरच मोठी शहरे ग्रामीण भागाशी जोडण्याकरिता शासनाने नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग हाती घेतला आहे. मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृध्दी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातून जात आहे. या महामार्गामध्ये शेतकर्‍यांच्या हजारो हेक्टर शेतजमीनी जात आहेत. जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांसाठी शासनाने विविध स्वरूपातील योजना आखल्या आहेत. मात्र, सुरूवातील मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाची मोजणी अडवून शेतकर्‍यांनी मोठय़ाप्रमाणावर विरोध केला. विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचे मन वळविण्याचा सर्वकष प्रयत्न प्रशासकीय पातळीवरून केला जात असून, जिल्ह्यातील जवळपास ५५ टक्केपेक्षा अधिक संयुक्त मोजणी झालेली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यातून हा रस्ता जात आहे. या महामार्गासाठी सुरूवातीला शेतकर्‍यांचा कडाडून विरोध झाला असला तरी आतापर्यंंंत १ हजार ५२ शेतकर्‍यांनी ११५0.४२ हेक्टर जमीनीचे संमतीपत्र शासनाकडे दिले आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यातील ४४५ शेतकर्‍यांनी ५३0.५७ हेक्टर जमीनीचे संमतीपत्र समृद्धी महामार्गाकरिता दिले आहे. लोणार तालुक्यातील १५३ शेतकर्‍यांनी १३२.६0 हेक्टर शेतजमीनीचे संमतीपत्र दिले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील २८८ शेतकर्‍यांनी ३३३.0४ हेक्टर शेतजमीनीचे संमतीपत्र व देऊळगाव राजा तालुक्यातील १६६ शेतकर्‍यांनी १५४.२१ हेक्टर जमीनीचे संमतीपत्र समृद्धी महामार्गाकरिता शासनाकडे दिले आहे. सुरूवातील समृद्धी महामार्गाकरिता विरोध झाला तरी आता हजारो शेतकर्‍यांनी या महामार्गासाठी संमती दर्शवली आहे. शेतकर्‍यांच्या शेतजमीनी या महामार्गात जात असल्याने संमतीपत्र देणार्‍या या शेतकर्‍यांना शासनाच्या ठोस मदतीची अपेक्षा आहे.