शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

 रेशन तांदूळ जप्तीचे ‘कनेक्शन’ गावोगावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:41 IST

काळ्या बाजारात धान्य विक्री करणारे पुरवठा विभागासोबतच पोलिसांच्याही रडारवर आहेत.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठवणूक केलेला रेशनचा तांदूळ जप्ती प्रकरणाचे गावोगावी कनेक्शन जुळत आहे. त्यामुळे पोलिसांनीही आपली तपासचक्रे ग्रामीण भागाच्या दिशेने फिरविली आहेत. काळ्या बाजारात धान्य विक्री करणारे पुरवठा विभागासोबतच पोलिसांच्याही रडारवर आहेत. आरोपींनी ज्यांच्याकडून तांदूळ खरेदी केला त्या शिधापत्रिकाधारकांवरही कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहे.लॉकडऊनच्या काळात जादा दराने धान्य विक्री, मालाची साठवणूक असे काही गैरप्रकार समोर आले आहेत. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील भादोला शिवारातील एका गोदामामधून काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवणूक करून ठेवलेला रेशनचा ४६ क्विंटल १२ किलो तांदुळ ६ जून रोजी सायंकाळी पकडला. यामध्ये १ लाख ६२ हजार १८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला तीन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना ८ जून रोजी एक दिवसावी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासाअंती आरोपीनी गावागावातून तांदूळ खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे गावागावाशी जुळलेले असल्याने पोलिस तपासही त्या दिशेने सुरू आहे. तहसील स्तरावरून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. कार्डधारकांकडून हा तांदूळ खरेदी केलेला असल्यास विक्रेत्यांवर या प्रकरणात कारवाई होऊ शकते.

आणखी मासे गळाला लागण्याची शक्यता जप्त केलेला हा तांदूळ नेमका कोणाच्या हिश्श्याचा होता याचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे काळ्या बाजारात धान्य विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

काळ्या बाजारात तांदूळ विक्री करणे जसा गुन्हा आहे, त्याचप्रमाणे कार्डधारकांनीही तो तांदूळ बाहेर कुठे विक्री करता येत नाही. यामध्ये रेशनचा तांदूळ विक्री करणारे कार्डधारकही दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होवू शकते.-गणेश बेल्लाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी.

गावागावतून रेशनचा तांदूळ जमा करून त्याचा साठा केलेला होता. या प्रकरणात आणखी काही गुन्हेगार सापडू शकतात. त्या दिशेने तपास सुरू आहे.-सारंग नवलकार, पोलीस निरिक्षक, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा