हर्षनंदन वाघ / बुलडाणायुती व आघाडी तुटल्यामुळे बदललेली राजकीय समीकरणे, मनसेची अनपेक्षित मुसंडी, त्या तच युवा व सर्वसामान्य जनतेने काँग्रेसच्या नव्या चेहर्याला दिलेली पसंती यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एका भल्या माणसाचा विजय झाला. या विजयामुळे सर्वसामान्यांना आपला विजय असल्याचे वाटत आहे. शिवाय नव्या पर्वाचा राजकारणात प्रारंभ झाला आहे.भाजप-सेना युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा विधानसभा म तदारसंघावर युतीचे विजयराज शिंदे यांनी आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र, यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-सेना युती तुटल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. भाजपने वेळेवर काँग्रेसमधून उमेदवार आयात करून योगेंद्र गोडे यांना रिंगणात उ तरविले. दुसरीकडे शिवसेनेचे विजयराज शिंदे यांना आपल्या सैनिकांसोबत किल्ला लढविण्याचे ठरविले. आघाडी तुटल्यामुळे नरेश शेळके यांनीही ह्यघड्याळह्ण हातावर बांधत निवडणुक रिंगणात उडी घेतली व प्रचार सुरू केला. या सर्व प्रचारात मनसेचे संजय गायकवाड यांनी निवडणुकीपूर्वीच इंजिनचा ताबा घेतला होता. ही लढत अतिशय चुरशीची झाली. गायकवाड व सपकाळ यांनी धनशक्तीविरोधात लढा असल्याचे सांगत अ ितशय लो-प्रोफाइल प्रचार यंत्रणा राबविली. त्याचा फायदा या दोघांना झाला. काँग्रेसचा नवीन चेहरा व मनसेचा लोकांच्या सुखदुखात धावुन जाणारा उमेदवार या दोघांनाही लोकांनी उत्तम पसंती दिली. मात्र, यामध्ये सपकाळ यांनी बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे चार उमेदवार असल्यामुळे समीकरणे बदलली. तरीही प्रत्येक उमेदवार विविध दाखले देत समाजातील प्रत्येक घटक आपल्याला पाठिंबा देतील, असा दावा करीत होते. विजयराज शिंदे यांनी मतदारसंघात केलेली कामे विजयश्री खेचून आणेल, असा दावा केला होता. मात्र, त्यांच्या विरोधात असलेली सुप्त लाट व सेनेतच लागलेला सुरुंग यामुळे त्यांचा पराभव अटळ ठरला. भाजपाचे योगेंद्र गोडे यांना मिळालेल्या मतांमध्ये त्यांच्या प्रचार यंत्रणेसोबतच मोदींचा प्रभाव एवढेच कारण आहे. शेवटी युती-आघाडी तुटल्यामुळे झालेला परिणाम, मतांचे झालेले विभाजन यामुळे अंदाज काढणे कठीण झाले होते.
काँग्रेसचा बहुप्रतीक्षित विजय, नव्या पर्वाचा प्रारंभ
By admin | Updated: October 20, 2014 00:14 IST