शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेस सेवादलाचा मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:22 IST

शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या  जळगाव जामोद येथील आरएफओ विरुद्ध कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी  काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी  कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकोट्यवधींचा भ्रष्टाचार करणार्‍या ‘आरएफओ’वर कारवाईची मागणीजिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या  जळगाव जामोद येथील आरएफओ विरुद्ध कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी  काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी  कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.स्थानिक गांधी भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर  काँग्रेस सेवादलाचे मोहन बाभुळकर, गौतम मोरे, अभय मोरे, प्रवीण गाडेकर,  तुळशीरावम नाईक, नीलेश हरकल, शेख मुजूभाई, शैलेश खेडेकर, अँड.विशाल गवई  आदींनी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की,  जळगाव जामोद येथील आरएफओ कांबळे यांनी पदाचा दुरूपयोग करून शासनाच्या  पैशाचा दुरूपयोग करून वरिष्ठ अधिकार्‍यांशी संगनमत करून भ्रष्टाचार केला आहे.  याबाबत दखल घेऊन सोनाळा येथे शेतकर्‍याच्या शेतात पुरलेले अस्वल प्रकरण, सोनबर्डी  बिटमध्ये कुजलेले अस्वल आढळले, एकामागे एक तीन अस्वल कुजलेल्या अवस्थेत  सापडले, तरीसुद्धा कार्यवाही शून्य आहे. त्यामुळे अस्वलाच्या अवयवांची तस्करी  झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मौजे मेढामारी कंपार्टमेंटमध्ये ३.७0 हे.आर. अ ितक्रमणाबाबत कारवाईस टाळाटाळ होत आहे. कंपार्टमेंट ६२१ मध्ये २0 मेंढपाळांचे  कुटुंब तीन हजार मेंढय़ांसह, जळगाव जामोद वनक्षेत्रात काठेवाडी गुरे दोन हजार गायी व  १0 कुटुंबे राहतात. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असे नमूद केले  आहे. या मोर्चात जवळपास १५0 पेक्षा जास्त सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी  झाले होते. 

टॅग्स :Buldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय