शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

चिखलीत काँग्रेस व्यक्तिकेंद्रित झाल्याने भ्रमनिरास झाला - नरेंद्र खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:35 IST

चिखली : गेल्या १७ वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करीत असताना मुकुल वासनिक यांच्यामुळे आपणास ग्रामविकासाशी संबंधित काही पदे मिळाली; मात्र २0१२ पासून आपणांस बाजूला सारण्यात आले आणि कायमच आपला शब्द डावलण्याचा चंग काही लोकांनी बांधला. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये काही काळापासून  घुसमट होत होती. हे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : गेल्या १७ वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करीत असताना मुकुल वासनिक यांच्यामुळे आपणास ग्रामविकासाशी संबंधित काही पदे मिळाली; मात्र २0१२ पासून आपणांस बाजूला सारण्यात आले आणि कायमच आपला शब्द डावलण्याचा चंग काही लोकांनी बांधला. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये काही काळापासून  घुसमट होत होती. हे वास्तव आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्ष व्यक्तिकेंद्रित झाला असून, सर्वच पदे एकाच व्यक्तिकडे किंवा त्यांच्या निर्देशानुसार वाटली जात आहेत. त्यामुळे ही घुसमट टाळण्यासाठी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे जे बाळकडू मिळाले त्यातूनच आपण काँग्रेसचा त्याग करून आपल्या मूळ पक्षात म्हणजे शिवसेनेत प्रवेश घेतला, असे स्पष्टीकरण प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.१२ फेब्रुवारीला मुंबईत शिवसेना भवनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रा.नरेंद्र खेडेकर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रा. खेडेकर यांच्या निवासस्थानी १४ फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जालींधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख सिद्धुसिंग राजपूत, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख नीलेश अंजनकर, शिवराणा मित्रमंडळाचे o्रीकिसन धोंडगे, विलास सुरडकर, रामकृष्ण आंभोरे यांची उपस्थिती होती.  प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी मार्च २0१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपण थांबण्याचा निर्णय जाहीर केला; मात्र ज्या गटातून मी तीन वेळेस निवडून आलो, त्या गटाचा उमेदवार ठरविताना मला विश्‍वासात घेण्यात आले नाही, तसेच माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नाही. सातत्याने मला डावलण्याचा आणि बाजूला सारण्याचा प्रयत्न एका गटाकडून करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. मतदार संघाचा चौफेर विकास केल्याचा आ.राहुल बोंद्रे यांचा दावा फोल असल्याचा आरोप करून केवळ जेसीबीने नद्या खोदणे म्हणजे विकास नाही. चिखली मतदार संघात आजवर कोणताही शाश्‍वत विकास झालेलाच नाही, असा आरोप करीत विकासाची व्याख्याच या मंडळींनी बदलून टाकली असल्याचे ते म्हणाले. आ.राहुल बोंद्रे यांच्याकडे असलेले जिल्हा बँकेचे कर्ज त्यांनी तत्काळ परत दिलेच पाहिजे; मात्र ही मागणी जो कोणी करतो त्याला प्रत्युत्तर देताना ते इतरांकडेही कर्ज बाकी असल्याचे दाखले देतात. प्रा. खेडेकर यांनी आ. बोंद्रेंना आव्हान देताना माझ्याकडील कोणतेही कर्ज (असल्यास) मी २४ तासांत भरतो, तुमच्याकडील कर्ज २४ दिवसांत भरा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर आता जिल्हय़ात आणि चिखली मतदार संघात शिवसेनेचा झंझावात निर्माण करणार. गारपिटीचे तत्काळ सर्वेक्षण व्हावे आणि शेतकर्‍यांना भरघोस मदत द्यावी. बुधवत यांनी प्रा.नरेंद्र खेडेकरांच्या शिवसेनेतील घरवापसीमुळे पक्षाला बळकटी आली असून, येत्या काळात जिल्हय़ात आणि चिखली मतदार संघात घराघरात शिवसेनेचा भगवा पोहोचविणार असून, चिखली मतदार संघासह जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघात आणि लोकसभा मतदार संघात भगवा फडकविणारच, असा निश्‍चय व्यक्त केला.