शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

काँग्रेसचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:14 IST

चिखली: मागासवर्गीय व अदिवासी कल्याणासाठी देण्यात आलेला निधी  गत आठ महिन्यांपासून अखर्चित असल्याने आदिवासी व मागासवर्गीय  लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत  असल्याचा आरोप करीत शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून  काँग्रेसच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’  आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआदिवासी, मागासवर्गीयांचा निधी आठ महिन्यांपासून अखर्चित!  शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेधमागासवर्गीय, आदिवासी समाज विकासापासून वंचित - उमाळकर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: मागासवर्गीय व अदिवासी कल्याणासाठी देण्यात आलेला निधी  गत आठ महिन्यांपासून अखर्चित असल्याने आदिवासी व मागासवर्गीय  लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत  असल्याचा आरोप करीत शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून  काँग्रेसच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’  आंदोलन करण्यात आले.जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन सभेत जिल्हय़ात राबविण्यात  येणार्‍या विविध कल्याणकारी योजनेसाठी मागासवर्गीय व अदिवासींसाठी  नियतव्यय सन २0१७-१८ साठी मंजूर असतानाही गत ८ महिने  मागासवर्गीय योजनांसाठी एक रुपयाही निधी वितरित न करून  मागासवर्गीय कल्याण योजनेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेले आहे. तर निधी  जिल्हा नियोजन कार्यालयाकडून वितरित न झाल्याने या योजनेवरचा  आजवरचा खर्च शून्य टक्के आहे.. अदिवासी विभागासाठी मंजूर निय तव्ययाच्या प्रमाणात अतिशय अल्प निधी वितरित करण्यात आलेला  असून, जेमतेम ४.३२ टक्के एवढाच निधी आजवर खर्च झाला आहे; मात्र  याच नियोजन विभागातून सर्वसाधारणसाठी जवळपास ३३ टक्के निधी  खर्च केला असल्याने संबंधित विभागाकडून मागासवर्गीय व आदिवासी  यांच्याकडे हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करी त जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाभरात ‘ढोल बजाओ’ आंदोलन आले.  याअंतर्गत ४ सप्टेंबर रोजी चिखली काँग्रेसच्यावतीने दुपारी १२ वाजता  तहसील कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करून शासनाच्या  उदासीन धोरणाचा निषेध करण्यात आला व             तहसीलदार मनीष  गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अ तहरोद्दीन काझी, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी,  संजय  पांढरे, समाधान सुपेकर, ज्ञानेश्‍वर सुरूषे, रफिक कुरेशी, डॉ.. इसरार,  नगरसेवक अ. रऊफ, दीपक थोरात, राजू रज्जाक, सुनील कासारे, विजय  गाडेकर, सचिन बोंद्रे, किशोर कदम, बिदुसिंग इंगळे, ईश्‍वर इंगळे  यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

मागासवर्गीय, आदिवासी समाज विकासापासून वंचित - उमाळकरमेहकर: काँग्रेसच्या राजवटीत शेतकरी, गोरगरीब जनता, शेतमजूर आदिवासी समाजबांधव, मागासवर्गीय समाजबांधव यांच्यासाठी विविध योजना सुरू केल्या होत्या. काँग्रेसने विविध योजनांवर निधी उपलब्ध करून मागासवर्गीय समाज, आदिवासी समाजबांधव यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न केले होते. त्याच योजना भाजप सरकार पुढे चालवित आहे; परंतु निधीअभावी अथवा निधी असूनही व आदिवासी समाजबांधवांना विकासापासून वंचित ठेवले जात आहेत. त्यामुळे या सरकारचा काँग्रेसच्यावतीने आम्ही निषेध करतो, असे काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी सांगितले. भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी मेहकर तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.