शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ ठराव बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:34 IST

खामगांव :   नगरपालिकेच्या सभेत वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली.  या सभेत सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ठराव पारित केले. सत्ताधा-यांनी बुधवारी पारित केलेला ठराव बेकायदेशीर असून, न्यायालयात टिकणार नाही, असा दावा काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.

ठळक मुद्देनगरसेवक गैरवर्तणूक प्रकरणभाजपवाल्यांनी केलेली शिफारस न्यायालयात टिकणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कखामगांव :   नगरपालिकेच्या सभेत वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली.  या सभेत सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ठराव पारित केले. सत्ताधा-यांनी बुधवारी पारित केलेला ठराव बेकायदेशीर असून, न्यायालयात टिकणार नाही, असा दावा काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.यासंदर्भात काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले, नगरसेवक तथा काँग्रेस शहर अध्यक्ष प्रवीण कदम, नगरसेवक अमेय सानंदा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले, की या सभेत काँग्रेस नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचनेत सर्व कायदेशीर मुद्दे मांडण्यात आले आहे. या सभेत  उपसूचनेद्वारे काँग्रेस नगरसेवकांनी  अध्यक्ष व भाजपाच्या नगरसेवकांना कायदा दाखवून त्यांच्या कर्तव्याची जाण करून दिल्यानंतरदेखील असंविधानिक पद्धतीने, बेकायदेशीररीत्या व राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन नगराध्यक्ष अनिता डवरे व भाजपा नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर अधिकाराचा दुरुपयोग करून बेकायदेशीर ठराव मंजूर करून गैरवर्तन केले आहे व काँग्रेसच्या १२ नगरसेवकांविरुद्ध कलम ९२  अन्वये गैरवर्तन केल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव घेतला आहे. १५  जानेवारी २०१८ रोजीच्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक-४ मधील पोटकलम ८१ च्या खंड ‘ब’मध्ये नगराध्यक्षांनी घेतलेल्या विषयावर मुख्याधिकारी यांचा तपशीलवार अभिप्राय असणे आवश्यक आहे; पण उक्त विषयावर महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये गैरवर्तन या सज्ञेंतर्गत कोणत्या कृतीचा समावेश होतो, असा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयाविषयी स्पष्ट अभिप्राय देता येणार नाही, अशी टिप्पणी उक्त विषयावर मुख्याधिकारी यांनी दिल्यामुळे सत्ताधारी भाजपवाल्यांचे  हसे झाल्याचाही दावा काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगरपालिकेतील काँग्रेसच्या पक्षनेत्या अर्चना टाले यांनी सांगितले. यावेळी  प्रवीण कदम, देवेंद्र देशमुख, अलकादेवी सानंदा, सरस्वती खासने, भूषण शिंदे, इब्राहिमखा सुभानखा,  शेख फारुख बिसमिल्ला, अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, नगरसेविका शीतल माळवंदे, संगीता पाटील, नगरसेविका शेख रेहानाबानो शेख मेहबुब हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

टॅग्स :khamgaonखामगावcongressकाँग्रेसMuncipal Corporationनगर पालिका