चिखली : शासनाने सर्व तूर खरेदीची घोषणा करूनही अद्यापपर्यंत जिल्हय़ातील अनेक केंद्रांवर विविध कारणे समोर करून तूर खरेदी टाळण्यात येत असल्याने शेतकर्यांना दिलासा देण्यात यावा व खरेदी केंद्रावर आलेली सर्व तूर दिलेल्या मुदतीत संपूर्णपणे खरेदी करावी, तातडीने चुकारे देण्यात यावे तसेच २२ एप्रिलनंतरही शेतकर्यांनी आणलेली तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे करण्यात आली असून, १0 दिवसांचा अल्टीमेटम देत मुदतीत तूर खरेदी न झाल्यास संबंधित यंत्रणेच्या अधिकार्यांना काळे फासण्याचा इशारादेखील दिला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी जिल्हाध्यक्ष विजय आंभोरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांना ४ मे रोजी याबाबत निवेदन देण्यात आले आहे. जिल्हय़ात शासकीय तूर खरेदी केंद्रावरील शेतकर्यांच्या समस्यांसंदर्भात बुलडाणा जिल्हा काँग्रेसने वेळोवेळी विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बुलडाणा जिल्हय़ात होणार्या शासकीय तूर खरेदी केंद्रावरील शेतकर्यांच्या समस्यांसंदर्भात बुलडाणा जिल्हा कॉंग्रेसने वेळोवेळी विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यात २१ एप्रिल रोजी जिल्हय़ातील प्रत्येक तालुका स्तरावर ठिय्या आंदोलन, तर २९ एप्रिल रोजी जिल्हाभर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर उठबशा आंदोलन करून तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले होते. निवेदनामध्ये शेतकर्यांच्या तुरीचा पूर्ण माल खरेदी करण्यात यावा, तुरीचे चुकारे त्वरित अदा करण्यात यावे, सर्व ठिकाणी त्वरित बारदाना उपलब्ध करून दयावा, २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी केंद्रावरील जमा असलेली तसेच २२ एप्रिल नंतरही शेतकर्यांनी खरेदी केंद्रावर आणलेली तूर खरेदी करण्यात यावी, संथ गतीने सुरू असलेली तुरीची खरेदी जलद गतीने सुरू करण्यात यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून, येत्या १0 दिवसात खरेदी केंद्रावरील संपूर्ण तूर खरेदी न केल्यास व या कामात टाळाटाळ करणार्या अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
तूर खरेदीच्या कोंडीमुळे काँग्रेस आक्रमक!
By admin | Updated: May 6, 2017 02:29 IST