शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या पदभरतीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 12:03 IST

Buldhana Health Department आरोग्य विभागाच्या भरतीत अन्याय झाल्याची तक्रार काही उमेदवारांमधून करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये एमएसडब्लू धारक शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांवर कंत्राटी आरोग्य विभागाच्या भरतीत अन्याय झाल्याची तक्रार काही उमेदवारांमधून करण्यात येत आहे. त्यामुळे या पदभरतीत गोंधळ निर्माण झाला आहे. मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी शैक्षणिक अर्हता असलेला उमेदवार न मिळाल्यामुळे या पदावर स्टे किंवा संपूर्ण एमएसडब्ल्यू पदवीधारक उमेदवार भरण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेमधून १२ जून २०२० ला आरोग्य विभागाच्या ३२ कंत्राटी रिक्‍त पदांच्या भरतीसाठी आवेदन मागितले होते. ही भरती पद क्रमांक सहा मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी एम.फिल. - पीएसडब्ल्यू ही शैक्षणिक पात्रता मागितली होती. या पात्रतेचा उमेदवार न मिळाल्यास एमएसडब्ल्यू ही अर्हता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देऊ, असा कुठलाही उल्लेख जाहिरातीमध्ये केलेला नाही. त्यामुळे अनेक एमएसडब्ल्यू शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी या भरतीत आवेदन भरलेले नाही. प्रत्यक्ष उमेदवाराची निवड करताना मात्र एमएसडब्ल्यू पदविधारक उमेदवाराची निवड करण्यात आली.  विशेष म्हणजे केवळ ६४.६४ गुणांनी एमएसडब्ल्यू उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचीही निवड यामध्ये करण्यात आली. उमेदवाराचे वय २३ वर्ष पूर्ण लागत असतानाही संबंधित उमेदवाराचे वय २२ वर्ष १५ दिवस इतके होते. संबंधित उमेदवाराने पाच वर्षांचा अनुभवही दाखविलेला आहे. मग या उमेदवाराला आधीच्या कार्यालयाने संबंधित शैक्षणिक पात्रता नसताना किंवा वयाच्या १८ व्या वर्षीच नोकरी दिली का? असा प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी एमएसडब्ल्यू पदवीधारक पी. बी. तोडकर, प्रभाकर वाघमारे यांनी केली आहे.  जि.प सीईअेासंह अन्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवीजिल्हा परिषद आरोग्य विभागातील पदभरती संदर्भातील गैरप्रकाराबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण जिल्हा शल्य चिकित्सकांकडे येत असल्याचे सांगितले, तर जिल्हा शल्य चिकित्सकांकडूनही या पदभरतीबाबत माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद