शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षार्थ्यांचा गोंधळ

By admin | Updated: April 20, 2015 22:42 IST

बी.एड्.ची चुकीची प्रश्नपत्रिका दिली; विद्यापीठाचा भोंगळ कारभार.

बुलडाणा : विषयाचे नाव बरोबर लिहून चुकीचे प्रश्न लिहिलेली प्रश्नपत्रिका दिल्यामुळे बी.एड्. परीक्षार्थींनी येथील दोन परीक्षा केंद्रांवर २0 एप्रिल रोजी सकाळी दोन तास गोंधळ केला. ज्या विषयाचा अभ्यास झाला नाही, त्या विषयाची प्रश्न पत्रिका दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत होता. दरम्यान, पोलिसांनी रोष व्यक्त करणार्‍या जमावाला शांत केले. यावेळी परीक्षार्थींनी काही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून झालेल्या गोंधळाची तक्रार प्राचार्य व परीक्षा केंद्र समन्वयक यांच्या माध्यमातून विद्यापीठाकडे पाठविली. बुलडाणा शहरातील जिजामाता महाविद्यालय व चिखली रस्त्यावरील कला महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान २0 एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान बी.एड्. परीक्षार्थींचा उदयोन्मूख भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण, हा पहिला पेपर होता. विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पहिला पेपरचा अभ्यास करून बी.एड्. परीक्षार्थी आ पल्या परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. सकाळी ९ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर प्रश्न पत्रिका वाटण्यात आल्या; मात्र प्रश्नपत्रिकेवर विषयाचे नाव बरोबर होते; मात्र विचारण्यात आलेले प्रश्न २३ एप्रिल रोजी होणार्‍या शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाचे होते. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला व विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. सदर परिस्थिती शहरातील जिजामाता महाविद्यालय व कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर निर्माण झाली होती. 

*१३ महाविद्यालयातील १२00 विद्यार्थ्यांना फटका

        बुलडाणा जिल्ह्यात १३ महाविद्यालये असून, त्यामधून १२00 विद्यार्थी बी.एड्च्या परीक्षेला बसले होते. आजच्या गोंधळामुळे या विद्यार्थ्यांना उदयोन्मूख भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण, हा पहिला पेपर आता ७ मे नंतर पुन्हा द्यावा लागणार आहे तर मानसशास्त्राचा २३ एप्रिल रोजी होणारा पेपर अमरावती विद्यापीठाला पुन्हा सेट करावा लागणार आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वेळा पत्रकाऐवजी दुसराच पेपर हातात आल्यामुळे विद्यार्थ्यांंना सोमवारी सकाळी मनस् ताप सहन करावा लागला.