शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात शनिवारी रंगणार ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेची दशा व दिशा’वर परिसंवाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 17:45 IST

बुलडाणा : आजच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या विविध समस्यांवर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित मान्यवरांच्या समवेत बुलडाणा येथे २३ डिसेंबरला शैक्षणिक परिसंवाद होणार आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक परिसंवाद बुलडाणा येथे २३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता गर्दे वाचनालय येथे होणार आहे.या परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केले आहे.

बुलडाणा : आजच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या विविध समस्यांवर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित मान्यवरांच्या समवेत बुलडाणा येथे २३ डिसेंबरला शैक्षणिक परिसंवाद होणार आहे. ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेची दशा व दिशा’ या विषयावर हा परिसंवाद रंगणार आहे. शैक्षणिक परिसंवाद बुलडाणा येथे २३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता गर्दे वाचनालय येथे होणार असून, या परिसंवादाचा विषय ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेची दशा व दिशा’ हा आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, प्रमुख वक्ते प्रा.प्रविण देशमुख हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून आ.राहुल बोंद्रे, आ.हर्षवर्धन सपकाळ, महेश कजगावकर, डॉ.श्रीराम पानझाडे, विजयराज शिंदे, राधेश्याम चांडक, धृपदराव सावळे, योगेंद्र गोडे, समाधान सावळे, सुनिल देशमुख, विश्वनाथ माळी, अ‍ॅड.कविमंडन, विश्वंभर वाघमारे, मधुकर पाटील, रविंद्र वानखडे, डॉ.विकास बाहेकर, शिवराज कायंदे उपस्थित राहणार आहेत. यामध्ये १ व २ जुलै रोजी घोषीत झालेल्या व उरलेल्या अघोषित शाळांना अनुदान देणे, १ नोव्हेंबर २००५ पुर्वी व नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, २००५ पुर्वी अंशत: अनुदानित तत्वावर रुजू झालेल्या व उच्च न्यायालयातून स्थगिती मिळालेल्या सर्व कर्मचाºयांचे भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करणे, सेवेत असताना जे कर्मचारी मृत पावलेले आहेत त्यांच्या पाल्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणे, १६२८ शाळांना प्रचलीत नियमानुसार वेतन अनुदान देणे, २००५ नंतर टप्पा अनुदानावर आलेल्या शिक्षकांचा प्रश्न, वरिष्ठ व निवड श्रेणी बाबतचा २३ आॅक्टोबर २०१७ रोजीचा शासननिर्णय रद्द करणे, प्लान वेतनामधील शिक्षकांचे नॉन प्लान वेतनामध्ये रुपांतर करणे असे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या सर्व प्रश्नावर चर्चा व्हावी व त्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविल्या जाव्यात यासाठी बुलडाणा येथे शैक्षणिक परिसंवाद घेण्यात येणार आहे. या परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा