शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

वहन मिरवणुकीने वासंतिक नवरात्रौत्सवाची सांगता

By admin | Updated: April 12, 2017 00:54 IST

चिखली- नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आदिशक्ती आई रेणुका देवी चरणी लाखो भाविक लीन झाल्याने, चिखली शहरात भाविकांचा जनसागर उसळला होता.

चैत्र यात्रा महोत्सव 

सुधीर चेके पाटील - चिखलीनवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आदिशक्ती आई रेणुका देवी चरणी लाखो भाविक लीन झाल्याने, चिखली शहरात भाविकांचा जनसागर उसळला होता. यंदा देवीच्या दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये लक्षणीय वाढ पहावयास मिळाली. त्यामुळे पहाटे ४ वाजेपासून उत्तरात्रीपर्यंत दर्शनासाठी लांबच लांग रांग लागली होती. दर्शनबारीतील भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी संस्थान, पालिका प्रशासन व तालुका प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती.लाखो भाविकांचे श्रध्दास्थान, भक्तांच्या नवसाला पावणारी, मनोकामना पूर्ण करणारी, ग्रामदेवता, आदिमाय, आदिशक्ती आई रेणुका देवी वासंतीक नवरात्रोत्सवाची सांगता व भव्य यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमा ११ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरण साजरा करण्यात आला. या यात्रेचे मुख्य आकर्षण रेणुकादेवीच्या अष्टभुजा प्रतिमेच्या वहन मिरवणूकीस सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुरूवात झाली आहे. ही भव्यदिव्य मिरवणूकीची सांगता तब्बल १८ तासांनंतर बुधवारी दुपारच्या सुमारास नगर परिक्रमेनंतर वहन मिरणुकीची सांगता होणार आहे. दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून आई रेणुका देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होवू नये, यासाठी तालुका प्रशासनासह शहरातील दानशूर भाविक व विविध समाजसेवी संस्थांनी विशेष दक्षता घेतली. श्री रेणुकादेवी संस्थान व श्री बचानंद स्वामी संस्थानच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या वासंतिक नवरात्रोत्सवानिमित्त शहराच्या मध्यस्थानी असलेल्या रेणुका देवी मंदिरात ४ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता घटस्थापनेनंतर उत्सवास सुरूवात झाली होती. ४ ते ११ एप्रिल या उत्सवकाळात दररोज दररोज भजन, आरती, सामुहिक गीतापठण आदी पार पडले. १० एप्रिल रोजी झेंडा मिरवणूक, सायंकाळी गळकरी, वगदी पूजन, भंदे मिरवणूक आणि दीपज्योती मिरवणूक काढण्यात आली होती. तर ११ एप्रिल चैत्र पौर्णिमेला रेणुकादेवीला भल्या पहाटे ४ वाजता नवरात्र उत्थापन व अभिषेक झाल्यानंतर शेलुदवासीयांचे मानाचे पातळ चढविण्यात आले. यानंतर दर्शनबारीत लागलेल्या भाविकांनी अत्यंत मनोभावे देविचे दर्शन घेतले. मंदिरात उत्तररात्रीपर्यंत भाविकांची मोठी रांग लागलेली होती. यात्रेनिमित्त घराघरात पाहुणे मंडळी, नोकरी व व्यवसायानिमित्त परगावी असलेले चाकरमाने नागरीक, लेकी-सुना यांची वर्दळ होती. वगदी प्रदक्षिणेदरम्यान अनेकांनी नवस फेडला. खण, गळकरी वगदी प्रदक्षिणा, नवसपूर्ती झेंडा मिरवणूक, यासह गेल्या तीन दिवसांपासून शहरातील आॅटोरिक्षा, टॅक्सी, बियाणे महामंडळ, बाजार समिती, अडत, हमाल, एस.टी.आगार, वकील संघ तसेच शहरातील विविध पक्ष संघटना, समाजसेवी संस्था, मित्रमंडळे, पतसंस्था आदींच्यावतीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येवून देविला पातळ अर्पण करण्यात आले. चर्मकार बंधू भगिनींची चित्तथरारक जिव्हा त्रिशुलधारी मिरवणुकीसह नवसपूर्ती परंपरेनुसार यावर्षीही पहावयास मिळाली. या यात्रेचे मुख्य आकर्षण सायंकाळी आई रेणुकादेवीच्या अष्टभुजा प्रतिमेची भव्य वहन मिरवणूक काढण्यात आली. वहन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सडासंमार्जन करून, रांगोळ्या चितारून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून देवीचे स्वागत केल्यानंतर मनोभावे पूजा करून दर्शनाचा लाभ सर्व जाती-धर्माच्या भाविकांनी घेतला. या मिरवणुकीत विविध ठिकाणांहून आलेले वाजंत्री वृंद, लोकनृत्य, मनोरंजक खेळ, कवायतीचे लेझीम, टीपरी मंडळाचे आर्कषक कार्यक्रम, गोंधळ, वाघ्या-मुरळी, भजनी मंडळ, पारंपारीक डफडे यांचाही समावेश होता.