शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करा-बबनराव लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:31 IST

बुलडाणा : देऊळगावराजा शहरातील पाणी पुरवठा योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने येत्या २० मार्चपर्यंत सुधारित प्रस्ताव सादर करावा, त्याला शासन स्तरावर तातडीने मंजुरी देण्यात येईल, त्यानंतर या योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून शहराला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी संबंधित अधिका-यांना दिले.

ठळक मुद्देपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचे निर्देश

बुलडाणा : देऊळगावराजा शहरातील पाणी पुरवठा योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने येत्या २० मार्चपर्यंत सुधारित प्रस्ताव सादर करावा, त्याला शासन स्तरावर तातडीने मंजुरी देण्यात येईल, त्यानंतर या योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून शहराला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी संबंधित अधिका-यांना दिले.पाणी पुरवठा संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत लोणीकर बोलत होते. त्यावेळी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, देऊळगावराजाच्या नगराध्यक्ष सुनीता शिंदे,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजेपी) सदस्य सचिव संतोषकुमार, देऊळगावराजाचे मुख्य अधिकारी प्रमोद कानडे, एमजेपीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुमारे ३२ हजार लोकसंख्या असलेल्या देऊळगावराजा शहरासाठी महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानातून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी सुमारे १३ कोटी २१ लाख रुपये इतक्या ढोबळ किमतीच्या भांडवली कामास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. शासनामार्फत आतापर्यंत १० कोटी ६६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.पालिकेने सहभागाची रक्कम जमा केली आहे. या योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, काही कामे बाकी आहेत. यासंदर्भात तसेच उर्वरित निधी मिळून ही कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी एमजेपीने येत्या पाच दिवसांत कामे मार्गी लावण्याच्या सूचना लोणीकर यांनी दिल्या. 

उंद्री योजनेचाही आढावाबुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. आमदार राहुल बोंद्रे यावेळी उपस्थित होते. टंचाई निवारण निधीमधून किंवा इतर निधीतून या गावाच्या योजनेसाठी प्रस्ताव देण्यात यावा, असे लोणीकर यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा