शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बदलते हवामान आणि शाश्वत शेतीवर साधला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

यावेळी कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार व कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जागतिक पातळीवर ...

यावेळी कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार व कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जागतिक पातळीवर होत असलेला हवामान बदल व त्याचा शेतीवर होत असलेला परिणाम याबाबत मनेश यदुलवार यांनी सखोल विचार मांडले. बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे जरुरीचे आहे, त्यासोबत जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे विस्तारित करण्यात येत असलेली हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यावी व तिचा शेती व्यवस्थापनात वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारत सरकारने भारतीय हवामान खात्याच्या साहाय्याने विकसित केलेले ‘मेघदूत व दामिनी’ ॲप शेतकऱ्यांच्या दैनंदिनीमध्ये हिताचे आहे, असे यदुलवार यांनी स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्याचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान साक्षर होऊन आपापल्या शेतीची उत्पादकता वाढविली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. जिल्हा कृषी हवामान केंद्र हे कृषी विज्ञान केंद्राच्या फलाटाचा उपयोग करून हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला पत्रिका (तालुकानिहाय व पीकनिहाय) जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा पोहोचविते, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे योग्य व्यवस्थापन करता येते. जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या अचूक व योग्यवेळी सातत्याने प्रसारित व विस्तारित होणाऱ्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते व ही शेती उत्पादनातील वाढ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय विकास दरात निश्चितच भर घालणारी ठरू शकते, असे मत मनेश यदुलवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रणव टोम्पे, संस्थापक अध्यक्ष पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी केले. या ऑनलाइन कार्यक्रमाचा जिल्ह्यातील व विदर्भातील प्रामुख्याने युवा शेतकरी व इतर शेतकरी बांधवांनी लाभ घेतला.