शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस विभागाच्यावतीने जातीय सलोखा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:30 IST

मेहकर : समाजामध्ये एकोपा राहावा, नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊन हिंदू-मुस्लीम बांधव गुण्यागोविंदाने राहावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच उत्सव, सण हे एकत्रितपणे साजरे होऊन गावात शांतता राहावी, यासाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड यांनी केले.

ठळक मुद्देनागरिकांनी उत्सव, सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : समाजामध्ये एकोपा राहावा, नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊन हिंदू-मुस्लीम बांधव गुण्यागोविंदाने राहावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच उत्सव, सण हे एकत्रितपणे साजरे होऊन गावात शांतता राहावी, यासाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड यांनी केले.गणेशोत्सव, पोळा, बकरी ईद या सणाच्या निमित्ताने मेहकर पोलीस विभागाच्यावतीने १७ ऑगस्ट रोजी शहरातून मुख्य मार्गाने जातीय सलोखा रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी राठोड बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर वैंजने यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी न.पा. उपाध्यक्ष जयचंद बाठिया, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, नगरसेवक विकास जोशी, आरोग्य सभापती मनोज जाधव, नियोजन सभापती तौफीक कुरेशी, महाराष्ट्र अर्बनचे सल्लागार गजानन देशमुख आदी उपस्थित होते. 

लोणारात जातीय सलोखा रॅलीविविध सण-उत्सवांमध्ये शांतता राहावी, यासाठी येथे १७ ऑगस्ट रोजी जातीय सलोखा रॅली काढण्यात आली. यासाठी नगराध्यक्ष भूषण मापारी व ठाणेदार आर.पी. माळी यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी उपनगराध्यक्ष साफियाबी बेगम नूर महम्मद खान, गटनेते शांतीलाल गुगलिया, आरोग्य सभापती शेख समद, काँग्रेस नेते नितीन शिंदे, बादशाह खान, भाजपा तालुकाध्यक्ष अँड.शिवाजी सानप, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, न.प.चे सर्व नगरसेवक तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

सिंदखेडराजा पोलीस स्टेशनच्यावतीने रॅलीगणोशोत्सव, पोळा व बकरी ईद काळात शांतता राहावी, हा उदात्त हेतू समोर ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा यांच्या संकल्पनेमधून सिंदखेडराजा पोलीस स्टेशनच्यावतीने शहरात गणेशोत्सव काळातील मार्गाने जातीय सलोखा रॅली काढण्यात आली. १७ ऑगस्ट रोजी शहरात शांतता कमिटीचे सर्व सदस्य, शाळा महाविद्यालये यांचे जवळपास ७00 ते ८00 विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सिंदखेडराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते यांनी रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीला तहसीलदार संतोष कणसे, नगराध्यक्ष अँड. नाझेर काझी, शिवाजी राजे जाधव यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी तहसीलदार संतोष कणसे, अँड.नाझेर काझी, असदबाबा, ठाणेदार बळीराम गीते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी छगनराव मेहेत्रे, अँड.संदीप मेहेत्रे, राजेंद्र अंभोरे, जगन ठाकरे, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील खेडेकर व पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.