शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सर्वसामान्य व्यक्ती हाच सेवेचा केंद्रबिंदू - राजेंद्र जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 16:44 IST

Khamgaon Subdivisional Officer खामगाव येथील नवनियुक्त उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : मानवी जीवनात तळागाळातील आणि वंचितांच्या सेवेला परमोच्च स्थान आहे. समाजातील शेवटचा घटक सुखी झाला की, समाज सुखी हीच आनंदमयी जीवनाची पहिली पायरी होय आणि म्हणूनच आपले पहिले प्राधान्य वंचित आणि सामान्यांच्या सेवेसाठीच आतापर्यंत राहीले आहे. या पुढेही राहणार आहे. खामगाव येथील नवनियुक्त उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याशी साधलेला संवाद...

कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत काय सांगाल?कोरोना या विषाणू संसर्गाने जगभर थैमान माजविले आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचारीही या आजाराला बळी पडताहेत. खामगाव उपविभागीय कार्यालय त्याला अपवाद नाही. त्यामुळे कोरोना जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणीकडे आपले प्रामुख्याने लक्ष राहील.

खामगावातील भूखंड घोटाळ्यात अन्याय झालेल्यांना कसा न्याय द्याल?खामगाव येथील भूखंड घोटाळ्याबाबत आपण ऐकूण आहोत. परंतु, सद्यस्थितीत या घोटाळ्यासंबंधित फाईल आपण पाहल्या नाहीत. त्यामुळे याबाबत आताच निश्चित काही असे सांगता येणार नाही. मात्र, या घोटाळ्याशी संबंधित सर्वच फाईलींच्या आपण खोलात जाणार आहोत. यातील अनियमिततांवर कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कारवाई करण्यासाठी आपण सदैव कटीबध्द आहोत.

भूखंड घोटाळ्यामुळे उपविभागाची राज्यात प्रतिमा मलिन झाली ?खामगावात गाजलेल्या भूखंड घोटाळ्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असे म्हणता येणार नाही. काही चांगली कामेही या विभागात निश्चितच झाली आहेत. ज्या कुणी घोटाळा केला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सकारात्मक आणि प्रामाणिकपणे सामान्यांना न्याय देण्यासाठीच आपले प्राधान्य राहील.

 समाजातील सर्वच दु:ख आपण एकाचवेळी नाहीशी करू शकत नाही. तेवढे सामर्थ्य कोणत्याही मनुष्यात नाही. परंतू सेवेला चांगल्या कर्माची जोड दिल्यास निश्चितच काही जणांच्या चेहºयावर आपण आनंद पसरवू शकतो. प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टीकोनातून अनेकांची दु:ख निश्चितच कमी होतात. खामगाव उपविभागातील समस्या कशा सोडविणार ?समस्या आणि संकटे कधीही एकटी येत नाहीत. त्याकेवळ खामगाव उपविभागातच आहेत, असेही नाहीत. शासकीय सेवेत सर्वत्रच समस्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवत, आपल्या कर्तव्याला प्रामाणिकपणे सामोरे गेलं की निम्या समस्या आपोआप सुटतात. उर्वरित समस्यांचा धैर्याने सामना करावा लागतो. त्यानंतर काही समस्या आपली पाठ सोडवितात. थोडक्यात सर्वांना समान न्याय हे तत्व अंगिकारत  समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे. आपण या अगोदर खामगाव उपविभागात सेवा केली असल्याने येथील भौगोलिक परिस्थितीची तसेच जनसामान्यांची बºयापैकी माहिती आहे. त्याचा कामकाजात निश्चित फायदा होईल.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत