शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या दर्जावर समितीची नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:24 IST

बुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीला नॉन एफएक्यू दर्जाचा  माल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जात असली, तरी  विक्रीला आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी संबंधित  तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी  अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांची समिती  नेमण्यात आली आहे.  शेतमालाच्या दर्जावर ही समिती नजर  ठेवत असून, या समितीने प्रमाणित केल्यावरच त्या मालाच्या  लिलावाला परवानगी मिळते. 

ठळक मुद्देविलंबाची प्रक्रिया समितीने प्रमाणित केल्यावरच मालाच्या लिलावाला परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीला नॉन एफएक्यू दर्जाचा  माल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जात असली, तरी  विक्रीला आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी संबंधित  तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी  अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांची समिती  नेमण्यात आली आहे.  शेतमालाच्या दर्जावर ही समिती नजर  ठेवत असून, या समितीने प्रमाणित केल्यावरच त्या मालाच्या  लिलावाला परवानगी मिळते. जिल्ह्यात तुरीचे चांगले उत्पादन झाल्यामुळे अद्यापही तुरीची  आवक बाजार समितीमध्ये होत आहे. तुरीला किमान आधारभूत  किंमत मिळावी म्हणून जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी खरेदी केंद्रे  सुरू केली. त्याचबरोबर या हंगामातील मूग, उडीद या पिकांची  आवक वाढत आहे. मूग व उडिदासह सर्व मालाला किमान  आधारभूत किंमत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी उत् पन्न बाजार समित्यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था  बुलडाणा यांच्याकडून सूचना दिलेल्या आहेत; मात्र नॉन एफए क्यू म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता कमी असलेल्या  मूग, उडीद व  इतर काही मालाचीही आवक होत आहे. त्यामुळे असा शेतमाल  खरेदी करण्याला अडचणी येत आहेत, त्यामुळे नॉन एफएक्यू  दर्जाचा शेतमाल तपासण्यासाठी पणन संचालनालय, महाराष्ट्र  राज्य पुणेच्यावतीने प्रत्येक तालुक्यात एक तालुकास्तरीय समिती  नेमण्यात आली आहे. या समितीकडून बाजार समितीमध्ये  येणार्‍या शेतमालाचा दर्जा तपासण्यात येतो. बाजार समितीला  नॉन एफएक्यू दर्जाचा माल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली  जाणार असली, तरी विक्रीला आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित  करण्यासाठी संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी  संस्था, तालुका कृषी अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सचिव यांची ही तालुकास्तरीय समिती आहे. या समितीने शे तमालाचा दर्जा प्रमाणित केल्यावरच त्या मालाच्या लिलावाला  परवानगी मिळणार आहे; मात्र ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ  असल्याने शेतकरी एवढा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे सध्या  शेतमालाचा दर्जा तपासण्याची ही पक्रिया शेतमाल खरेदी- विक्रीसाठी अडचणीची ठरत आहे. 

शेतमालाची खरेदी-विक्री खोळंबलीशेतमालाचा दर्जा तपासण्यासाठी तालुकास्तरीय समिती नेमण्यात  आलेली आहे; मात्र या सर्व प्रक्रियेला वेळ अधिक लागत  असल्याने शेतकरी माल सोडून पैशांसाठी प्रतीक्षा करू शकत  नाहीत. सुरुवातीला या समितीकडे शेतमाल तपासणीसाठी  पाठविणे, त्यानंतर समितीकडून शेतमालाचा दर्जा प्रमाणित  करण्यासाठी प्रतीक्षा करणे, या सर्व प्रक्रियेला लागणारा वेळ व्या पारी व शेतकर्‍यांना परवडणारा नाही. त्यामुळे अनेक शेतकरी या  प्रक्रियेतून जाण्यास तयार नसल्याने शेतमालाची खरेदी-विक्री  खोळंबली आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला आलेल्या मालाचा  दर्जा प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समिती  नेमण्यात आली आहे.  या समितीकडून शेतमालाचा दर्जा  प्रमाणित केल्यानंतर खरेदी-विक्री होते.- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा.