शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात ‘बाप्पा’ला श्रद्धेचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:56 IST

सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाची १0 दिवस मनोभावे  आराधना केल्यानंतर गुरुवारी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी  आपल्या लाडक्या गणरायाला भव्य मिरवणूक काढून वाजत-गाजत  उत्साही वातावरणात निरोप दिला. सकाळी ९ वाजता मानाचा लाकडी  गणपती मंदिरात आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात  आली.

ठळक मुद्देखामगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेतसकाळी ९ वाजता मानाचा लाकडी गणपती मंदिरापासून झाली  मिरवणुकीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाची १0 दिवस मनोभावे  आराधना केल्यानंतर गुरुवारी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी  आपल्या लाडक्या गणरायाला भव्य मिरवणूक काढून वाजत-गाजत  उत्साही वातावरणात निरोप दिला. सकाळी ९ वाजता मानाचा लाकडी  गणपती मंदिरात आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात  आली. मानाचा लाकडी गणपती फरशी भागात आल्यानंतर शहरातील  मिरवणूक सुरू झाली. या मिरवणुकीमध्ये अग्रभागी मानाचा लाकडी  गणपती त्यानंतर तानाजी गणेश मंडळ शिवाजी नगर, हनुमान गणेश  मंडळ, राणा गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ, आदर्श गणेश मंडळ,  जय गजानन गणेश मंडळ, सिंधी गणेश मंडळ, रामदल गणेश मंडळ,  जगदंबा गणेश मंडळ, स्वामी गणेश मंडळ, अमरलक्ष्मी गणेश मंडळ,  दत्तगुरू गणेश मंडळ, वीर हनुमान गणेश मंडळ, जय बजरंग गणेश  मंडळ, वंदेमातरम् गणेश मंडळ, तेलगुराज गणेश मंडळ, श्रीकृष्ण  गणेश मंडळ, सराफा गणेश मंडळ, जय संतोषी मॉ गणेश मंडळ, मॉ  आत्मशक्ती गणेश मंडळ, नेताजी गणेश मंडळ, क्रांती गणेश मंडळ,  चंदनशेष गणेश मंडळ, त्रिशुल गणेश मंडळ, राष्ट्रीय गणेश मंडळ,  जय भवानी गणेश मंडळ अशी २७ मंडळे सहभागी झाली होती.  यावर्षीही निर्मल टर्निंग ते फाटकपुरा भागात कलम १४४ (३) हे  कलम लावण्यात आले होते. या कलमानुसार पोलीस परवानगी,  बंदोबस्तावरील कर्मचारी तसेच पूर्वपरवानगीशिवाय गणेश मंडळ  कार्यकर्त्यांना फिरण्यास मनाई करण्यात आली होती. यावर्षी निर्मल  टर्निंगपासून एक-एक मंडळ याप्रमाणे फाटकपुरा भागापर्यंत मिरवणूक  काढण्यात आली. फाटकपुरा भागातून पुढील मंडळ निघून गेल्यानंतर  निर्मल टर्निंग येथून नंतरच्या मंडळाला प्रवेश देण्यात आला. यावेळी  चोख पोलीस  बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच आवश्यक  ठिकाणी सीसी कॅमेरे व शूटिंग कॅमेरे लावण्यात आले होते.  संवेदनशील भागातील परिसरात बॅरिकेट लावण्यात आले होते. चहा, नाश्ता व जलसेवामिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांसाठी विविध जणांनी सेवा दिली.  यामध्ये ब्रह्मदलाच्यावतीने पुरी-भाजी, भादवी माता सिद्धेश्‍वर लाकडी  गणपती मंडळाच्यावतीने ११ क्विंटलचे पोहे, खामगाव अर्बन  बँकेच्यावतीने चहा, सदगरू श्रीधर महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने  खिचडी, सुरेका परिवाराकडून पोळी-भाजी तर पुरवार परिवार, बोहरा  परिवार, सूरज धानुका, तेरवाडिया परिवार यांच्यासह अनेकांनी  गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सेवा दिली. मान्यवरांचा मिरवणुकीत सहभागमिरवणुकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री ना.भाऊसाहेब  फुंडकर, आ.अँड.आकाश फुंडकर, माजी आ.दिलीपकुमार सानंदा,  माजी आ. नानाभाऊ कोकरे, नगराध्यक्ष  अनिता डवरे, माजी  नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, माजी न.प. उपाध्यक्ष वैभव डवरे,  कृउबास सभापती संतोष टाले, भारिप-बमसंचे अशोक सोनोने  आदींसह इतर पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी आदींचा  सहभाग होता. मस्तान चौकात ना.भाऊसाहेब फुंडकर, आ.अँड.  आकाश फुंडकर यांनी गणेश मंडळ पदाधिकार्‍यांचे स्वागत केले, तर  सानंदा मित्र मंडळाच्यावतीने गणेश मंडळ पदाधिकार्‍यांचे स्वागत  करण्यात आले. विविध नगरसेवकांनीसुद्धा हजेरी लावली.

हे ठरले मिरवणुकीतील आकर्षणतानाजी मंडळाचे अमृतसर,पंजाब येथील निशान ए खालसा पथकाची  चित्ताकर्षक प्रात्यक्षिके, तानाजी व चंदनशेष मंडळाचे मुलींचे मल्लखांब  पथकाच्या कसरती,  हनुमान मंडळाचे लाठीकाठी, तलवारबाजी व  अन्य कसरती,  राणा मंडळाचे गणपती स्वार असलेला अश्‍वरथ तसेच  नृत्यकलाकार तर वंदेमातरम् गणेशोत्सव मंडळाने गो ग्रीनचा संदेश  देणारे टी-शर्ट व जनजागृती करणारे फलक लावले होते. वीर हनुमान  मंडळाने सर्वधर्मसमभाव व पर्यावरण बचाओविषयी, श्रीकृष्ण मंडळ  आठवडी बाजारच्यावतीने वृक्षारोपण याविषयी जनजागृती केली.  चंदनशेष मंडळासोबतच इतर मंडळांनी विविध सामाजिक विषयांवर  गणेशोत्सव या लोकोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती केली. बाळापूर  फै लातील जगदंबा मंडळाची रुद्र अवतार धारण केलेली गणेशमूर्ती  सर्वांचे आकर्षण ठरली होती.

मिरवणुकीवर निगराणीसाठी पोलिसांचा तिसरा डोळाविसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी मुख्य चौकांमध्ये  सीसी कॅमेर्‍यांसह दुर्बिणीचा वापर केला, तसेच विविध चौकांत  मिरवणूक पास करण्यासाठी हिरव्या व लाल रंगाचे दिवे लावून  सिग्नलची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीसाठी चोख  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यामध्ये स्वत: पोलीस अधीक्षक  शशीकुमार मीणा, एएसपी श्याम घुगे, डीवायएसपी प्रदीप पाटील,  शहर पोस्टेचे ठाणेदार उत्तमराव जाधव, शिवाजी नगर पोलीस  स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांनी हजर राहून विविध पोलीस  अधिकार्‍यांसह पोलीस कर्मचारी, सीआरपीएफ, एसआरपीएफ  जवान, दंगाकाबू पथकासह होमगार्ड आदी अनेक जवानांना  ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, कृषी मंत्री तथा  पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार  यांनी भेट दिली.