शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:57 IST

Buldhana News महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता याविषयी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविले आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने सुरुवातीला ९ ते १२पर्यंत व त्यानंतर ५ ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याविषयी चर्चा सुरू झाली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सावंत यांनी १५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली होती. तसेच याविषयी निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. बुलडाणा जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. तसेच कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.  त्यामुळे सद्यस्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीचा विचार करता  २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्वीप्रमाणेच सुरू असलेले ऑनलाइन वर्ग सुरू ठेवावे त्यानंतर जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करून महाविद्यालये प्रत्यक्ष उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. महाविद्यालय बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollegeमहाविद्यालय