शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आता जिल्हास्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:43 IST

मंगळवार १९ मे रोजी बुलडाणा येथेच या उत्तरपत्रिकांच्या संकलनासाठी नियामकाना बोलाविले आहे.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन हे नियामकांकडून जिल्हास्तरावरच व्हावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरल्यानंतर अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने आपला यापूर्वीचा निर्णय बदलवित आता मंगळवार १९ मे रोजी बुलडाणा येथेच या उत्तरपत्रिकांच्या संकलनासाठी नियामकाना बोलाविले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावी व दहावीची परीक्षा पार पडली. दहावीच्या परीक्षेचा पेपर बाकी असतानाच कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउन घोषित झाले. त्यामुळे दहावीचा पेपर न घेता त्याचे सरासरी गूण दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शासकीय स्तरावर घेण्यात आला. बारावी व दहावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षक व मॉडरेटर यांच्याकडेच पडून होत्या. लॉकडाउनचा कालावधी सतत वाढत गेल्याने शिक्षण मंडळाने प्रत्येक जिल्हास्तरावर आपले अधिकारी व कर्मचारी पाठवून जिल्ह्यातील नियामकाकडून सर्व उत्तरपत्रिका व गुणपत्रिका गोळा करण्याचा निर्णय घेतला. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने यवतमाळ व वाशीम या दोन्ही जिल्ह्यात आपले अधिकारी व कर्मचारी पाठवून नियामकाकडून उत्तरपत्रिका व गुणपत्रिका गोळा केल्यात. अमरावती जिल्ह्यातील मॉडरेटर यांना शिक्षण मंडळाच्या कार्यालयातच बोलविण्यात आले होते. परंतु बुलडाणा व अकोला जिल्ह्यात ह्या पद्धती राबवण्यास असमर्थता दर्शवित या दोन्ही जिल्ह्यातील मॉडरेटर यांनी अमरावती येथे शिक्षण मंडळाच्या कार्यालयात उत्तरपत्रिका व गुणपत्रिका पोहोचवून द्याव्यात असे परिपत्रक अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने काढले होते.या परिपत्रका विरोधात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनसह सर्व शिक्षक संघटनांनी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाला निवेदन देत नाराजी व्यक्त केली.दरम्यान, अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव अनिल पारधी यांनी नवीन परिपत्रक काढून बुलडाणा जिल्ह्यातील मॉडरेटर यांनी जिल्हास्तरावरच आपले साहित्य जमा करावे असे निर्देश दिले.त्यानुषंगाने १९ मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बारावीच्या नियामकाना बुलडाणा येथे बोलाविण्यात आले. अकोला शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर तेथील निर्णय सध्या राखून ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र