शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी, तापाच्या रुग्णांची खासगी रुग्णालयांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 11:57 IST

अनेक रुग्ण औरंगाबाद, अकोला, जालन्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचे लक्षण असल्याने सर्दी, तापाच्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची संख्या घटली तर दुसरीकडे खासगी रुग्णालये हाउसफुल्ल झाले आहेत. अनेक रुग्ण औरंगाबाद, अकोला, जालन्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे, यातील पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींग होत नसल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.शहरी भागापुरता मर्यादीत असलेल्या कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात शिरकाव झाला आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. सर्दी, खोकला आदी लक्षणे असलेले अनेक ग्रामस्थ क्वारंटीन होण्याच्या भितीने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांएवजी खासगी रुग्णालयात उपचार करीत आहेत. त्यामुळे, कॉन्टॅक्ट ट्रेसींग होत नसल्याने समुह संसर्गाची भिती आहे. अनेक खासगी डॉक्टरही पॉझिटीव्ह येत आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांचीही माहिती मिळत नसल्याने हे रुग्ण कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र जिल्हा भरात आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यापेक्षा अनेक जण अकोला, औरंगाबाद, जालना व इतर शहरातील खासगी डॉक्टरांकडे उपचार करून घेत आहेत. असे रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्याविषयी माहिती स्थानिक आरोग्य विभाग आणि प्रशासनाला मिळण्यास बराच विलंब होतो. यादरम्यान त्या रुग्णांच्या संपर्कातील लोक बिनधास्तपणे फिरुन कोरोनाचे संक्रमण वाढवत आहेत.इतर जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह आलेले रुग्ण थेट १० ते १५ दिवसांनी गावाकडे परततात. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून क्वारंटीन करून उपचार सुरू करणे आहे. मात्र, गामस्थ क्वारंटीन होण्याच्या भितीने सरकारी रुग्णालयांपासून दूरच राहत असल्याचे चित्र आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २०० ते ३०० रुग्णांची तपासणी व्हायची. गत काही दिवसांपासून येथे १० ते २० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. या परिसरातील सहा खासगी डॉक्टरही पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची माहितीच मिळत नसल्याने कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणाही हतबल असल्याचे चित्र आहे.सर्दी, ताप, खोकला आदी त्रास असणाऱ्या ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावी. खासगी डॉक्टरांनीही असे रुग्ण आल्यास त्यांचे समुपदेशन करून याविषयी स्थानिक प्रशासन व आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसींग होत नसल्याने ग्रामीण भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.- डॉ.किशोरकुमार बिबे,वैद्यकीय अधिकारी, डोणगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल