शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयातून कोरोना लढ्यात महत्त्वाची भूमिका - डॉ. दिलीप पाटील भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 10:58 IST

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याशी साधलेला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सकारात्मक दृष्टीकोण वृद्धींगत करत पोलिस दलाचे मनोबल उंचावलेले असल्याने कोरोना लढ्यात पोलिस प्रशासन आरोग्य, महसूल, जिल्हा परिषद प्रशासनासोबत समन्वयातून जमिनस्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. प्रतिबंधीत क्षेत्राच्या आखणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ते साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह संचारबंदीची कडक अंमलबजाणी करण्यात पोलिस प्रशासन कार्यरत आहे. मधल्या काळात ३८ पोलिसही संदिग्ध रुग्ण म्हणून समोर आले होते. त्यामुळे पोलिस प्रशासन चर्चेत आले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याशी साधलेला संवाद.

कारोना संदर्भाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी हाताळत आहात?कोरोना संदर्भाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, यादृष्टीने चोख उपाययोजना केल्या आहेत. संचारबंदीचे उल्लंघन, हिंसेची प्रकरणे, सायबर गुन्हे आणि शासकीय कामातील अडथळे यासंदर्भाने जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीच्या संदर्भाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.

प्रतिबंधीत क्षेत्र व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या दृष्टीने पोलिसांची भुमिका काय?पोलिसांनी प्रो अ‍ॅक्टीव भूमिका असून पॉझिटिव्ह रुग्ण आढळ््यानंतर प्रतिबंधीत क्षेत्राचे स्टॅक्चर, केंद्रबिंदू, बफर झोन निर्मितीसाठी एसडीओ, जिल्हाधिकारी यांना त्वरित माहिती देणे पॉझिटिव्ह रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह, ये-जा करणाऱ्यांची तपासणी व संचारबंदीच्या अंमलबजावणीचे दायित्व पोलिसांचे आहे.

पोलिसांच्या आरोग्यसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत.?पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी अनेक उपक्रम घेतले. माझे आरोग्य माझ्या हाती, मीच माझा रक्षक अशी भूमिका घेऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा व साहित्य दिले आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रतिकार शक्ती वर्धक काढ्याचाही उपक्रम राबविला.

‘त्या’ कर्मचाºयांचे प्रकरण कसे हाताळले?कामठी येथील धर्मप्रचारकांपैकी तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना प्रारंभी परत जाण्याची परवानगी देण्याच्या निमित्ताने ३८ पोलिस कर्मचारी त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू सकारात्मक मानसिकता ठेवून सर्व पोलिस कर्मचारी सामोरे गेले. त्यामुळे त्यांच्या चाचण्याही निगेटीव्ह आल्या. एका कर्मचाºयाच्या रिपोर्ट संदर्भा त अडचण होती. मात्र कणखरतेच्या जोरावर त्यानेही मात केली. या काळात या पोलिस कर्मचाºयांच्या कुटुंबियांशी सतत संवाद साधून त्यांना आधार देत पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून आपण जबाबदारी सांभाळली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत