नांदुरा(जि. बुलडाणा): जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल ३ मार्च रोजी घोषित झाला असून, यामध्ये शिवाजी पाटील यांच्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय होऊन आठ उमेदवार विजयी झाले, तर तीन उमेदवार या आधीच अविरोध झालेले आहेत. सहकार पॅनलचे सर्वसाधारण संघातून शिवाजी त्र्यंबक पाटील यांना १३८ मते तर भगवान श्रीराम सोयस्कार १२६, विष्णू हरिभाऊ चोपडे ११९, निंबाजी राजाराम डामरे ११३, वासुदेव महादेव क्षीरसागर १0४, वासुदेव नारायण घाटे ९८ असे सहा जण विजयी झाले, तर परिवर्तन पॅनलच्या पराजीत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते अशी: रामविजय केदार ढोरे ९१, नीळकंठ जनार्दन सरोदे ८९, संतोष एकनाथ सातव ६८, बाळु विश्वनाथ तायडे ८३, प्रकाश विनायक वानखडे ७५ अशी आहेत. सहकार पॅनलमधून इतर मागास प्रवर्गातून प्रकाश पुंडलिक चवरे यांना १२१ मते मिळून विजयी झाले आहेत, तसेच याच पॅनलमधून अनु.जाती, जमातीमधून ईश्वरसिंग नारायण कुवारे हे ११६ मतांनी विजयी झाले आहेत, तर विरोधी परिवर्तन पॅनलचे इमावमधून सुरेश तुकाराम बढे यांना ७३ मते मिळून ते पराजीत झाले तर याच पॅनलचे अनु.जाती, जमातीमधून नवलसिंग शिवसिंग चव्हाण यांना ७९ मते मिळून पराजीत झाले. सहकार पॅनलचे अकराही उमेदवार विजयी झाल्यामुळे पुन्हा पुढील पाच वर्षासाठी ही संस्था त्यांच्याच ताब्यात राहणार आहे.
शिक्षक पतसंस्थेत ‘सहकार’ पॅनल
By admin | Updated: March 4, 2016 02:25 IST