शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
2
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
3
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
4
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
5
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
6
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
7
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
8
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
9
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
10
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
11
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
12
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
13
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
14
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
15
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
16
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
17
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
18
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
19
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
20
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप

‘सीएमआर’ तांदूळ वाहतूक निविदा थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 16:40 IST

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात ‘सीएमआर’ तांदूळाच्या वाहतुकीसाठी निविदा प्रक्रीया राबविण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला जिल्हा पुरवठा विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे.

- अनिल गवई

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात ‘सीएमआर’ तांदूळाच्या वाहतुकीसाठी निविदा प्रक्रीया राबविण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला जिल्हा पुरवठा विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्याही आदेशाची अवहेलना केल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कंत्राटदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याची जोरदार चर्चा प्रशासकीय वर्तुळात होत आहे.

राज्यातील सर्वच जिल्ह्यात आधारभूत धान्य खरेदी योजनेतंर्गत धानापासून प्राप्त झालेल्या ‘सीएमआर’ तांदुळाच्या वाहतुकीसाठी शासन परिपत्रक क्र. विसउस/का.- २/२०१७ ते २०१९ धा.तां/ वाहतूक दर दि. २२ आॅक्टोबर २०१८ अन्वये वाहतूक निविदा प्रक्रीया राबविण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार राज्यातील चंद्रपूरसह काही जिल्ह्यांमध्ये सीएमआर तांदूळ वाहतुकीसाठी निविदा प्रक्रीया राबविण्यात आली आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीची निविदा प्रक्रीया गेल्या तीन महिन्यांपासून थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. शासन अद्यादेश आणि जिल्हाधिकाºयांच्या निर्देशांना डावलून जिल्हा पुरवठा विभागाकडून ही निविदा प्रक्रीया थंडबस्त्यात टाकण्यात येत असल्यामुळे नजीकच्या काळात सीएमआर तांदूळ वाहतुकीमध्ये पुन्हा घोटाळा होण्याचे संकेत या निमित्ताने मिळत आहेत. 

जिल्हा पुरवठा विभागाकडून सीएमआर तांदूळ निविदाप्रक्रीयेप्रकरणी हेतूपुरस्परपणे चालढकल केली जात असून, पुरवठा विभागातील लेखा विभागातंर्गत काही झारीतील शुक्राचार्य या निविदेला खोळंबा घालत असल्याचे समजते. दरम्यान, तांदुळाचा काळाबाजार रोखण्यासाठी सीएमआर तांदूळ वाहतुकीची निविदा पूर्ण होऊन कंत्राटदार नियुक्त होत नाही, तोपर्यंत तांदूळाची वाहतूक भारतीय अन्न महामंडळाच्या खामगाव येथील गोदामातूनच करणे गरजेचे आहे. तसेच प्रशासकीय कामातील पळवाटा शोधून, तांत्रिक अडसर निर्माण करून शासकीय योजना विस्कळीत करणाºयांविरोधात जिल्हाधिकाºयांनी मोहिम उघडण्याची आवश्यकता असल्याचेही गरजेचे बनले आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू.काळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाही.

कंत्राटदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी खटाटोप!

सीएमआर तांदूळ वाहतुकीसाठी निविदा प्रक्रीयेच्या माध्यमातून कंत्राटदाराची नेमणूक न झाल्यास, ऐनवेळी तातडीचे कारण दर्शवून, गोरगरीब लाभार्थ्यांच्या नावाखाली या वाहतुकीचा कंत्राट पुन्हा जुन्याच कंत्राटाराला अव्वाच्या सव्वा भावाने देण्याचा प्रमुख उद्देश यामागील असल्याचे जिल्हा पुरवठा विभाग वर्तुळात बोलले जात आहे. मागील कालावधीप्रमाणेच धान्य वाहतूक अफरातफरीला प्रोत्साहन देण्यासाठीच हा सर्व आटापिटा सुरू असल्याचे दिसून येते. 

जिल्हाधिकाºयांची दिशाभूल!

तांदूळ वाहतूक निविदेसाठी शासन परिपत्रकानुसार तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निरूपमा डांगे यांनी आॅक्टोबर २०१८ मध्येच दिलेत. मात्र, तब्बल तीन महिन्यांपासून  जिल्हा पुरवठा विभागाकडून निविदा प्रसिध्द करण्यात आली नाही. तांत्रिक अडचणींचा फायदा उठवित, पुरवठा विभागाकडून ही प्रक्रीया लांबविण्यात येत असून, जिल्हाधिकाºयांनाही याप्रकरणी अंधारात ठेवल्या जात आहे. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणी सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर निलंबिणाची कारवाई करून निविदा प्रक्रीयेला गती द्यावी, अशी अपेक्षा आहे.

२०१७-१८ मध्ये तिप्पट झाली होती वाहतूक!

सन २०१७-१८ मध्ये भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात तांदूळ उपलब्ध असतानाही अमरावती येथील वाहतूक कंत्राटदारास आर्थिक फायदा पोहोचविण्यासाठी नागपूर, गोदींया, भंडारा येथून बाजारभावापेक्षा तिप्पट जादा दराने हजारो टन तांदूळाची वाहतूक करण्यात आली होती. या वाहतुकीच्या ‘ट्रान्सपोर्ट’पासचा घोळ ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता.  त्यामुळे वाहतूक कंत्राटदाराचा दोनवेळा रक्कम मिळविण्याचा प्रयत्न फसला होता.

सीएमआर तांदूळ वाहतूक निविदा प्रकरणी फाईल सादर करण्यात आली आहे. मात्र,  सीएमआर तांदूळ वाहतूक करण्यासाठी नियमित कंत्राटदार मिनीमम सपोर्ट प्राईज (एमएसपी) ने वाहतूक करण्यास तयार असतील, तर त्यांना विचारणा करण्यासाठी शासनाचे नव्याने पत्रप्राप्त झाले आहे.

- प्रशांत खैरनार, अव्वल कारकून, जिल्हा पुरवठा विभाग, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगाव