शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST

बिबी : वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या रब्बी हंगामातील ...

बिबी : वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत आहेत.

बिबी परिसरात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने रब्बी पिकांवर राेगराईचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे खरीपपाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण झाले हाेते, तसेच धुकेही पडल्याने रब्बी पिके धाेक्यात आली आहेत. वातावरणातील बदलामुळे तूर पिकांची फूलगळ होऊन अळीने आक्रमण केल्याने तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आता रब्बी हंगामही सततच्या बदलामुळे, बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आला आहे. तुरीचे उत्पादनही घटले असून, त्यात शेतातील सुडी गंजी पेटविण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. तुरीचे कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी जमा करण्यासाठी बिबी परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. बाेंडअळीमुळे कपाशीची लवकरच उलंगवाडी झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.