शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ३.७० लाख लोकांमागे एक ‘क्लास वन’ डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 14:52 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये १३ वैद्यकीय अधिक्षकांसह ५० विशेषतज्ञांची आवश्यकता आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेमध्ये ‘क्लास वन’ डॉक्टरांचा मोठा अभाव असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. लोकसंख्येचा विचार करता जिल्ह्यातील ३ लाख ७० हजार लोकांमागे केवळ एक ‘क्लास वन’ डॉक्टर कार्यरत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये १३ वैद्यकीय अधिक्षकांसह ५० विशेषतज्ञांची आवश्यकता आहे.आजही गोरगरीब रुग्णांची धाव जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयामध्येच आहे. परंतू शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टरांची वाणवा ही नित्याचीच झालेली आहे. विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिक्षक, वर्ग एक दर्जाचे वैद्यकीय अधिकारी सरकारी रुग्णालयांमध्ये सापडणे मोठे अवघड आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्याची वाट पकडावी लागते. जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाख ८६ हजार २५८ आहे. त्यामध्ये शहरी भागाची ५ लाख ४८ हजार ८६० व ग्रामीण भागाची लोकसंख्या २० लाख ३७ हजार ३९८ आहे. ऐवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी वर्ग एक दर्जाच्या केवळ सात डॉक्टरांवर आहे. तालुकाभरातील लोक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात जातात. परंतू जिल्ह्यातील १२ पैकी ११ रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारीच नाही. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आहेत, परंतू ते सुद्धा रजेवर आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा, उप जिल्हा रुग्णालय खामगाव, शेगाव व मलकापूर येथेही वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा अभाव आहे.दोन वर्षापासून ६३ पदे रिक्तजिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय याठिकाणी ७० क्लास वन डॉक्टरांचे पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ सात पदे भरलेले असून, ६३ पदे रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षापासून रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात २० पदांऐवजी पाच भरलेले आहेत. स्त्री रुग्णालयात पाचही पदे रिक्त आहेत. उप जिल्हा रुग्णालय खामगाव येथे १६ पदांपैकी केवळ एक पद भरण्यात आलेले आहे. शेगाव व मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही हीच परिस्थिती आहे.

ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये क्लास वनची सात पदे भरलेली आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. वर्ग दोनची पदे भरलेली आहेत. रिक्त पदे असतानाही चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असतो.- प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdoctorडॉक्टर