शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी

By संदीप वानखेडे | Updated: May 28, 2023 17:57 IST

परस्परविराेधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

संदीप वानखडे, मोताळा : शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २७ मे रोजी रिधोरा जहांगीर शिवारात घडली. याप्रकरणी तक्रारीवरून दोन्ही गटांतील सात जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील रिधोरा जहांगीर येथील दिगंबर चांगो मानकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची चार एकर शेती असून, तीन भाऊ आहेत. त्यापैकी एक भाऊ गजानन मानकर हा मृत झालेला आहे, तर त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला आहे. त्याची मुलगी सुजाता ही २१ वर्षांची असून, तिचा सुनील घाटे यांचा मुलगा पवन घाटे याच्यासोबत साखरपुडा झालेला आहे. सुजाताच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने गावशिवारातील गट क्र. ७६ मधील साडेसात एकर शेतीची ती वारस आहे. आजपर्यंत ती शेती फिर्यादी मानकर यांनी वहिती करून त्यातून आलेले पैसे हे सुजाताच्या पालन- पोषणासाठी खर्च केले.

दरम्यान, शनिवारी, दि.२७ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काही लोक सुजाताच्या नावे असलेल्या शेतात नांगरटी करीत असल्याची माहिती फिर्यादीस मिळाली. त्यावरून फिर्यादी आणि त्याचा भाऊ, असे दोघे शेतात गेले असता तुम्ही आमच्या शेतात नांगरटी का करीत आहात, असे विचारले असता सुनील घाटे, पवन घाटे, विजय धांडे, निंबाजी गायकवाड यांनी लोखंडी रॉड, काठी तथा चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटातील भोरटेक येथील निंबाजी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते साक्षीदार यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करीत होते.

दरम्यान, त्याठिकाणी रिधोरा येथील डिगंबर मानकर, विकास मानकर आणि कमलाकर मानकर हे तिघे आले, तसेच नांगरटी का करता असे म्हणून वाद घातला, तसेच जातिवाचक शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी डिगंबर मानकर, विकास मानकर आणि कमलाकर मानकर या तिघांविरुद्ध अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघ हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी