शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात नागरिकांच्या लेखी कोरोना आता संपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 12:20 IST

Khamgaon News : शहरात कुठल्याही भागात गेले तरी, दहापैकी सात लोक विनामास्कचे पाहायला मिळतात.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून नागरिकांनी मास्क वापरणे कमी केले आहे. आता कोरोना संपला, असेच त्यांना वाटत आहे. सध्याच्या स्थितीत शहरात कुठल्याही भागात गेले तरी, दहापैकी सात लोक विनामास्कचे पाहायला मिळतात. ‘लोकमत’ने याबाबतचे वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, हा धक्कादायक प्रकार शहरात सर्वत्र पाहायला मिळाला. कोरोना विषाणू संसर्ग आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात आल्या. लॉकडाऊन, कडक निर्बंध लावण्यात आले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. दरम्यान, आता कोरोनाचे संकट काही प्रमाणात टळले असले तरी, तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याची भीती व्यक्त होत आहे. अद्याप काही जणांना कोरोना संसर्गाचा फटका बसत असताना, नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीत वाढच होत आहे. बाजारपेठ, बँका आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असतानाच मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही अनेकांकडून टाळला जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.पोलिसांचाही मास्क तोंडाखाली!n काही ठिकाणी कारवाई करणारे पोलीस विनामास्क पाहायला मिळत आहेत. स्वत:लाच मास्क नसल्याने इतरांवर कारवाई करताना ते हात आखडता घेत असल्याचे दिसते. काही मोजके कर्मचारी वगळता इतरांकडून मास्कचा वापर होताना दिसत नाही.

कोरोना महामारीत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण कमी आहे. मात्र, कारवाई नाहीच असे नाही. नियम न पाळणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाईसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. - मनोहर अकोटकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, खामगाव.

विनामास्क तसेच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठीही शहर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचे संकट पूर्णत: टळले नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.- सुनील अंबुलकर, शहर पोलीस निरीक्षक, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या