शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चौंढी, आलेवाडी, अरकचेरीची प्रकल्पांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 11:13 IST

Buldhana District News : आलेवाडी, अरकचेरी आणि चौंढी प्रकल्पाची कामे भूसंपदानाच्या प्रक्रियेतील अडथळ्यामुळे रखडली आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने बळीराजा संजीवनी योजनेतंर्गत येत असलेल्या आलेवाडी, अरकचेरी आणि चौंढी प्रकल्पाची कामे भूसंपदानाच्या प्रक्रियेतील अडथळ्यामुळे रखडली आहेत. संयुक्त मोजणीनंतरही काही शेतकऱ्यांनी जादा मोबदल्याची मागणी केली आहे. त्याचाही फटका ही प्रकल्पाच्या पुर्णत्वास बसत आहे .सुमारे ६७३ कोटी १६ लाख रुपये खर्च या तीनही प्रकल्पांसाठी अपेक्षीत असून यापैकी काही निधी अद्याप अप्राप्त आहे. तीनही लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांद्वारे सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकूण क्षमतेच्या जवळपास ६८ हजार हेक्टरवर होणाऱ्या सिंचनामध्ये वाढ होऊन ते ७० हजार हेक्टरवर पोहोचेल. मात्र चौंढी प्रकल्पाच्या घळभरणीच्या प्रक्रियेमध्ये मात्र अडचण येण्याची शक्यता आहे. मालकी हक्कासंदर्भातील काही प्रकरणांमध्ये समस्या आहेत. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणीनंतर फळझाडांची लागवड केलेली आहे. त्यांची मागणी वाढीव मोबदल्याची आहे. त्यामुळेही भूसंपादनाच्या प्रक्रियेत अडचणी येत आहे. तिन्ही प्रकल्पांचे भूसंपादनाचे काम जवळपास पूर्णत्वास आलले आहे. मात्र मोजक्या काही अडचणीमुळे त्यात समस्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर भूसंपादनाची प्रकरणे त्वरेने मार्गी लागल्यास २०२३ अखेर या प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष सिंचनाचे लाभ मिळण्यास प्रारंभ होईल, असे संकेत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे.गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत या प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी येत असलेल्या अडचणीचाही आढावा घेण्यात आला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प