शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या प्रश्नांनी केले अंतर्मुख!

By admin | Updated: March 14, 2016 01:46 IST

बालकुमार साहित्य संमेलनाच्या दुस-या दिवशी झालेल्या अभिरूप न्यायालयात पालकांसह राजकीय पक्ष, शिक्षणसंस्था आरोपीच्या पिंज-यात.

बुलडाणा : देशात लोकशाही असताना घरात मात्र पालकशाही का? ऋतू बदलाप्रमाणे शाळांच्या वेळा का बदलत नाहीत, दप्तराचे ओझे कमी करणार तरी कधी, आमचं करिअर आम्हाला ठरवू द्या, हे करू नको, ते करू नको, असा ससेमिरा संपणार आहे का, राजकारण वाईट, त्यात जाऊ नको, मग चर्चा कशाला करता? बालकांच्या अशा एक ना अनेक प्रश्नांनी अभिरूप न्यायालय दणाणून गेले व या प्रश्नांची उत्तरे देताना पालक, शिक्षण संस्था व राजकीय क्षेत्राच्या प्रतिनिधींना दरदरून घाम फुटला.स्थानिक गर्दे सभागृहात आयोजित राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी दुसर्‍या सत्रात अभिरूप न्यायालय भरले होते. ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे न्यायाधीश असलेल्या या न्यायालयात राजकीय क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी म्हणून अकोल्याच्या प्रभात किड्सचे संचालक डॉ.गजानन नारे, पालकांचे प्रतिनिधी म्हणून प्रख्यात साहित्यिक सीमा रोठे-शेटे हे आरोपींच्या पिंजर्‍यात होते. या न्यायालयात बालकांवर पालक, समाज, शिक्षणसंस्था व कुटुंब यांच्या अपेक्षांचे असलेले ओझे या वतरुळाभोवती प्रश्नांची गुंफण बालकांनी केली. ऋतू बदलतो, मग शाळांची वेळ का बदलल्या जात नाही? राजकारण हे करिअर होऊ शकते का? नेत्यांकडे एवढा पैसा कोठून येतो, पालक आमचा विचार कधी करणार, अशा अनेक प्रश्नांनी न्यायालयासह संपूर्ण गर्दे सभागृह अंतर्मुख झाले. या न्यायालयात इंद्रायणी शेळके, अभिषेक देशमुख, यशङ्म्री जवरे, अर्थ साळवे, ङ्म्रेया गायकवाड, रूचा टाकळकर, मैत्री लांजेवार या बालकांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारी वकील म्हणून नरेंद्र लांजेवार यांनी बालकांची बाजू चांगलीच लावून धरली. न्यायालय सुरू होण्यापूर्वी आरोपींचा परिचय पत्रकार राजेश शेगोकार यांनी तर आभार पत्रकार अरूण जैन यांनी मानले.