शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

चिखली पंचायत समितीच्या दोन सदस्यांचे जात प्रमाणपत्र रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:31 IST

चिखली: अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या चिखली पंचायत समिती निवडणुकीपश्‍चात सभापती-उपसभापती निवडणुकीच्यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना उण्यापुर्‍या वर्षभराच्या आतच प्रशासनाने चांगलाच जोरदार झटका दिला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस-भाजपाला जोरदार झटका : पंचायत समिती वतरुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या चिखली पंचायत समिती निवडणुकीपश्‍चात सभापती-उपसभापती निवडणुकीच्यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना उण्यापुर्‍या वर्षभराच्या आतच प्रशासनाने चांगलाच जोरदार झटका दिला आहे. राखीव गणातून विजयी झालेल्या दोन सदस्यांनी निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्न सादर न केल्याने त्यांचे पं.स. सदस्यत्व रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी पारित केले आहेत. सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांपैकी एक सदस्य काँग्रेसचा तर एक भाजपाचा असल्याने उभय पक्षांच्या पायाखालील वाळू सरकली असून, यामुळे पंचायत समितीच्या सत्तेचे गणित पुन्हा एकदा बिघडण्याचे संकेत असल्याने पं.स. वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ४ ऑगस्ट २0१६ च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १२-अ, ४२(६)(अ), ६७(७-अ) नुसार राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांनी ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या सदस्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत करवंड या राखीव गणातून विजयी झालेले गजानन बाळकृष्ण इंगळे व सवणा या राखीव गणातून निवडून आलेल्या शे. फरीदाबी नासेर या दोन सदस्यांनी शासन निर्णयानुसार सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांनी संबंधित विभागास दिला होता. त्यावरून जात प्रमाणपत्र सादर न करणार्‍या सदस्यांना अपात्रतेचे औपचारिक आदेश पारित करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकार्‍यांनी गजानन इंगळे व शे. फरीदाबी नासेर या दोन सदस्यांची  निवड रद्द केल्याचे आदेश पारित केले आहेत. या कारवाईने या दोन्ही सदस्यांना चांगलाच धक्का बसला आहे.     

सत्ता समीकरण बिघडण्याची शक्यता!एकूण १४ सदस्य संख्या असलेल्या चिखली पंचायत समितीमध्ये भाजपा ७, काँग्रेस ५, शेतकरी संघटना १ आणि शिवसेना १ असे पक्षीय बलाबल आहे. असे असताना १४ मार्च २0१७ रोजी पडलेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या एका सदस्याने गैरहजेरी दर्शविली तर शिवसेना व शेतकरी संघटनेने काँग्रेसला सहकार्य केल्याने सभापतीपद काँग्रेसकडे गेले तर उपसभापतीपद मोठय़ा गदारोळानंतर भाजपाच्या वाट्याला आहे. त्या पश्‍चात आता दोन सदस्यांचे पद रद्द झाल्याने पं.स. वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पद रद्द झालेल्या सदस्यांपैकी एक सदस्य काँग्रेसचा तर एक भाजपाचा असून, हे दोन्ही पक्ष कट्टर विरोधक असले तरी पंचायत समितीच्या सत्तेत वाटेकरी असल्याने दोघांनाही या सदस्य रद्दच्या आदेशाचा फटका बसण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते सदस्यत्व रद्द झालेल्या दोन्ही पं.स. सदस्यांना घरी बसण्याची वेळ आल्यास पोटनिवडणुकीतून पंचायत समितीतील सत्तेची उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे या दोन सदस्यांमुळे पदारूढ सदस्यांचेही धाबे दणाणले आहे. तर राजकीयदृष्ट्या गेल्या वर्षभराच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने यदाकदाचित पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लागल्यास ती नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे मोठे औसुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :chikhali roadचिखली रोडbuldhanaबुलडाणा