शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

चिखली मतदारसंघातील १७ कोटी ३५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचा अर्थसंकल्पात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:20 IST

चिखली : राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात चिखली मतदारसंघातील चार रस्त्यांच्या लांबीची सुधारणा करण्यासाठी १ हजार ७३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करवून घेतला असल्याचा दावा जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी केला आहे.

चिखली मतदारसंघातील १७ कोटी ३५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचा अर्थसंकल्पात समावेशलोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात चिखली मतदारसंघातील चार रस्त्यांच्या लांबीची सुधारणा करण्यासाठी १ हजार ७३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करवून घेतला असल्याचा दावा जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी केला आहे.त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात असे म्हटले आहे, की विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत राज्याचे अंदाजपत्रक सादर केले. या अर्थसंकल्पात अनेक विकास कामे व योजनांवर खर्च होणाºया निधीची घोषणा करण्यात आली. यामध्ये चिखली तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या चार कामांचा समावेश झाला आहे. यापैकी राज्य मार्ग २२१ ला जोडणाºया उंद्री-तोरणवाडा-धोत्रा नाईक या रस्त्याच्या लांबीची सुधारणा करण्यासाठी ४०० लाख रुपयांची तर वरवंड-उंद्री रस्ता रुंदीकरणासाठी ५३५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.  दुधा-माळवंडी-केसापूर-केळवद या रस्त्याच्या लांबीची सुधारणा करण्यासाठीदेखील ४०० लाख रुपये तर धोडप-पेठ-एकलारा-अंबाशी या रस्त्याच्या सुधारणेसाठीसुद्धा ४०० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्यांसाठी निधी मिळावा, यानुषंगाने जि.प. सभापती श्वेता महाले यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे यासंदर्भात नियमितपणे पाठपुरावा केल्याने या अर्थसंकल्पात रस्ते दुरुस्तीच्या चार कामांचा समावेश झाला असल्याची माहिती देऊन महाले यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा