शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
4
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
5
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
6
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
7
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
8
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
9
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
10
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
11
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
12
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
13
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
14
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
15
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
16
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
17
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
18
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
19
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
20
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चिखली : मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक : वेतनवाढ अहवालाची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:02 IST

चिखली: एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल एसटी कर्मचार्‍यांच्या आयोग कृती समितीने फेटाळला असून, या अहवालाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने चिखली आगारात २५ जानेवारी रोजी या अहवालाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देमेहकर : होळी करून आक्रोश मोर्चा व संपाचा इशारा!

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल एसटी कर्मचार्‍यांच्या आयोग कृती समितीने फेटाळला असून, या अहवालाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने चिखली आगारात २५ जानेवारी रोजी या अहवालाची होळी करण्यात आली.एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यानंतर उच्च न्यायालयाने यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार अहवाल जारी करण्यात आला आहे; मात्र हा अहवाल तयार करताना संपकरी कर्मचार्‍यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सौजन्यही शासनाच्या प्रधान सचिवांनी दाखविले नाही, उच्च न्यायालयाने वेतनवाढीचा अहवाल देण्याबाबत सांगितले असताना समितीने त्याऐवजी स्वत:च्या अखत्यारीत असलेल्या महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीचे विवरण केले, इतर राज्यातील परिवहन मंडळे तोट्यात असताना त्यांनी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली असताना महाराष्ट्रात या बाबीला बगल दिल्या जात आहे. उलटपक्षी समितीने सर्व भत्ते वाढविण्याऐवजी कमी करण्याची शिफारस केली, वर्षिक वेतनवाढ ३ टक्केऐवजी २ टक्के, घरभाडे १0 ऐवजी ७ टक्के याप्रमाणे सर्व भत्यांमध्ये घट केली, वेतनवाढीची अंमलबजावणी १ एप्रिल २0१६ ऐवजी १ जानेवारी २0१८ पासून पुढे ४ वर्षांची केली आहे, आदी आरोप इंटक संघटनेने केले असून, हा अहवाल कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून व कामगारांना तुच्छ समजून जाणीवपूर्वक वस्तुस्थितीपासून दूर जाऊन तयार केला असल्याचे स्पष्ट करीत हा अहवाल महाराष्ट्र इंटक व आयोग कृती समितीमधील कुठल्याही संघटनेला मान्य नसल्याचे संघटनेने जाहीर केले असून, याचा निषेध करण्यासाठी चिखली आगारात एसटी कर्मचार्‍यांनी होळी केली. यावेळी इंटकचे अमरावती प्रदेश सचिव अनंत सानप,  डेपो अध्यक्ष महेंद्र सदावर्ते, सचिव अविनाश वेंडोले, आनंद अवसरमोल, गणेश इंगळे, भारत सुरडकर,  सुनील पाटील, एलवांडे, जीवन जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते. 

मेहकर : होळी करून आक्रोश मोर्चा व संपाचा इशारा!एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यासांठी दिवाळी सणाच्या दरम्यान संप पुकारला होता. सदर मागण्या सोडविण्यासाठी न्यायालयाने एका उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली होती. त्या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालानुसार कर्मचार्‍यांचे समाधान न झाल्याने त्या अहवालाच्या विरोधात मेहकर आगाराच्या कर्मचार्‍यांनी २५ जानेवारी रोजी अहवालाचीच होळी केली. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी वेतनवाढ व इतर मागण्यांसंदर्भात दिवाळी सणाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संप पुकारला होता. या संपामुळे त्यावेळी सर्वसामान्यांची चांगलीच धांदल उडाली होती. या कर्मचार्‍यांना शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात मोबदला मिळत नसल्याने नाराजीचा सूर आहे. सदर मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगार संघटनेच्या कार्यकारिणीने शासनाक डे लोकशाही मार्गाने पाठपुरावा केला होता; मात्र तरीही शासनाने सदर मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. शासन व कर्मचारी यांच्यामध्ये न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती नेमून कर्मचार्‍यांच्या मागणीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना उच्चस्तरीय समितीला केल्या होत्या. त्यामुळे उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल तयार केला असून सदर अहवालानुसार कर्मचार्‍यांचे समाधान झाले नसल्याने मेहकर आगारातील कर्मचार्‍यांनी होळी आंदोलन केले. यावेळी कामगार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किसनराव बळी, इंटक चे विभागीय कार्याध्यक्ष सतीश तेजनकर, डेपो अध्यक्ष डी.एस.मगर, सुनील राठोड, सचिव शेख अबरार, एस.बी. पाटील, एस.पी. जाधव, नागेश कांगणे, अशोक चांदणे, पी.ए. आघाव, यू.आर.देशमुख, डी.एल.निकम, टी.एस. तेजनकर, डी.यू. सराटे, व्ही.ए.चेके, पंढरी आघाव, यशवंत खरात, एस.के. सोनुने, सोनु जाट, आत्माराम कायंदे, अनिल पाटील, पाचपोर, अंगद चव्हाण, राम सवडतकर, एन.एल. साबळे, शंकर नागरिक आदी कर्मचार्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील वर्षात संप पुकारला होता. या संपानुसार उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालामध्ये कर्मचार्‍यांचे समाधान न झाल्याने १९ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे सहकुटुंब विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे व त्यानंतरही मागण्या मंजूर न झाल्यास पुन्हा संप पुकारण्याचा इशारा यावेळी कर्मचार्‍यांनी दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाchikhali roadचिखली रोडMehkar bus standमेहकर बस स्टँड