शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारी पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:33 IST

खामगाव : प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांना खामगाव नगर पालिका ‘नकोशी’ असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही पालिकेत भेट दिली नाही. परिणामी, खामगाव नगर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देपालिकेचा कारभार ढेपाळला! 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांना खामगाव नगर पालिका ‘नकोशी’ असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही पालिकेत भेट दिली नाही. परिणामी, खामगाव नगर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळल्याचे दिसून येते.खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर ९ एप्रिलपासून दीर्घ रजेवर गेले आहेत. दीर्घ रजेवर जाण्यापूर्वी काही दिवस मुख्याधिकारी बोरीकर किरकोळ रजेवर होते. तथापि, गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी बोरीकर यांचे खामगाव पालिकेत मन रमत नसल्याची चर्चा असतानाच, अचानक ते महिनाभराच्या दीर्घ रजेवर गेले. त्यांच्या अनुपस्थितीत खामगाव नगर पालिकेचा पदभार शेगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याकडे सोपविण्यात आला. मुख्याधिकारी पंत यांनी ९ एप्रिल रोजी खामगाव पालिकेचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यासाठी केवळ १0-१५ मिनीटे ते नगर पालिकेत आले. पदभार स्वीकारल्यानंतर सुटीचे दिवस सोडून आठ दिवस लोटले. मात्र, या आठ दिवसांच्या कालावधीत एकदाही मुख्याधिकारी पंत यांनी खामगाव पालिकेला भेट दिली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’ तर नाही ना? अशी चर्चा पालिका वतरुळात रंगत आहे. 

पदभार स्वीकारण्यावरून होती नाराजी !खामगाव पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर दीर्घ रजेवर गेल्यानंतर त्यांच्या रिक्त पदाचा प्रभार स्वीकारण्यास मुख्याधिकारी अतुल पंत शेवटच्या क्षणापर्यंत नाराज होते. त्यामुळे  खामगाव पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सुत्रे घेण्यास सुरूवातीपासूनच कोणतेही स्वायरस्य दाखविले नाही. वरिष्ठांच्या आदेशानंतर त्यांनी सुत्रे स्वीकारली मात्र, पदभार घेतल्यापासून ते पालिकेत फिरकलेच नसल्याने, अतुल पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’ असल्याची चर्चा आहे.

यहा पे सब शांती शांती है!मुख्याधिकारी नसल्याने पालिकेत  येणार्‍यांची संख्या कमालिची रोडावली आहे. पालिकेत कुणीही फिरकत नसल्याने ‘यहा पे सब शांती शांती है!’ या ओळीचा प्रत्यय येत आहे. तथापि, कुणाचाही वचक नसल्याने कर्मचारीही सैरभैर झाल्याचे चित्र पालिकेत गेल्या आठ-दहा दिवसांपासून सतत दिसून येत आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव