शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा बुलडाण्यात ‘सेल्फी विथ जेसीबी’

By atul.jaiswal | Updated: March 3, 2018 12:55 IST

प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शनिवारी बुलडाणा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी उद्घाटनस्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर जेसीबी व पोकलेश मशिनसोबत सेल्फी काढला.

ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या पथदर्शी कार्यक्रमाची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यापासून होत असून, यासाठी ‘बीजेएस’ने १३४ जेसीबी/पोकलेन मशिन्स खरेदी केल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी उद्घाटन करण्यात आले. येथील ए.आर.डी. मॉल समोरच्या पटांगणात पार्क करण्यात आलेल १३४ जेसीबी/पोकलेन मशिनसोबत सेल्फी काढण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना आवरला नाही.

बुलडाणा : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत संपूर्ण बुलडाणा जिल्हा एका वर्षात दुष्काळमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शनिवारी बुलडाणा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी उद्घाटनस्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर जेसीबी व पोकलेश मशिनसोबत सेल्फी काढला.भारतीय जैन संघटनेच्या पथदर्शी कार्यक्रमाची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यापासून होत असून, यासाठी ‘बीजेएस’ने १३४ जेसीबी/पोकलेन मशिन्स खरेदी केल्या आहेत. एका वर्षात ४ कोटी क्यूबिक मिटर गाळ काढून किमान ५० हजार एकर जमीन सुपिक करून सुमारे २८ अब्ल लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढविणाºया कार्यक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी येथील ए.आर.डी. मॉल समोरच्या पटांगणात पार्क करण्यात आलेल १३४ जेसीबी/पोकलेन मशिनसोबत सेल्फी काढण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना आवरला नाही. यावेळी त्यांच्यासोबत नितीन गडकरी, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, बीजेएसचे शांतीलाल मुथ्था व इतर मान्यवर उपस्थित होते. बुलडाण्यातील क्रेडाई तर्फे या ठिकाणी १० बाय १० व १० फुट उंचीचा सेल्फी पॉइंट बनविण्यात आला आहे.बीजेएसचे शांतीलाल मुथ्था व श्री जितेंद्र जैन यांनी या सेल्फी पॉईटवर फोटो घेऊन उदघाटन केले. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या सेल्फी पॉईटवरून सेल्फी काढून सोशल मिडीया द्वारे बुलडाणा जिल्ह्याच्या माहितीसह सर्वांना पाठवावी असे आवाहन जितेंद्र जैन व राजेश देशलहरा यांनी केले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPandurang Phundkarपांडुरंग फुंडकरNitin Gadakriनितिन गडकरी