शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

आमदारांनी गाजविली मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

By admin | Updated: December 20, 2014 00:20 IST

बुलडाणा जिल्ह्यातील आमदार विकासप्रश्नावर आक्रमक.

बुलडाणा: विधिमंडळ अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या जिल्हा आढावा बैठकीत सिंचन, खामगाव-जालना रस्ता, खडकपूर्णा प्रकल्प, जिगाव प्रकल्पासोबतच भूसंपादनास पुनर्वसनाचे मुद्दे आमदारांनी उपस्थित केल्याने ही बैठक गाजली. या मुद्यांचा गंभिर्याने विचार करीत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय देत या निर्णयाबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नागपूर विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात बुलडाणा जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी आमदार भाऊसाहेब फुंडकर, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ.संजय रायमुलकर, हर्षवर्धन सपकाळ, प्रा. शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव अजय मेहता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, अपर जिल्हाधिकारी चिंतामण जोशी, पोलीस अधीक्षक श्याम दिगावकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना देण्यासोबतच प्रकल्पाचे भूसंपादन आणि पुनर्वसनास प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.