शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री रविवारी नांदुर्‍यात; लघु प्रकल्पांच्या कामांना होणार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:02 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासह आठ लघु प्रकल्पांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ परिहवन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी नांदुरा येथे प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देजलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांचीही राहणार उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासह आठ लघु प्रकल्पांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ परिहवन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी नांदुरा येथे प्रारंभ होत आहे.बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत या कामांचा हा शुभारंभ होत आहे. राज्यात  निधीअभावी रखडलेल्या २१ मुख्य व ८३ लघु अशा एकूण १0४ प्रकल्पांची कामे  आता शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेतून पूर्ण होणार आहे. शेतकरी आ त्महत्याग्रस्त तथा  दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यातील प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.  त्यात विदर्भातील ८१ रखडलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत  जिल्हय़ातील जिगावसह आठ लघु प्रकल्पांसाठी अनुदान मिळणार आहे.  नांदुरा  येथे १७ डिसेंबर रोजी या कामांचा शुभारंभ होत आहे. सकाळी ११ वाजता  कोठारी  विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश  महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील उ पस्थित राहणार आहेत. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प केंद्र शासनाने  मंजूर केलेल्या अर्थसहाय्यतेंतर्गत जिगावसह या आठ प्रकल्पांचे काम पूर्ण होणार  आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगली  आहे.

या प्रकल्पांचा समावेशयामध्ये संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी, अरकचेरी, खामगाव तालुक्यातील  निम्न ज्ञानगंगा प्रकल्प, मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी, देऊळगाव राजा तालुक्यातील  दिग्रस कोल्हापुरी बंधारा, लोणारमधील बोरखेडी मिश्र संग्राहक तलाव आणि मो ताळा तालुक्यातील राहेरा संग्राहक तलावाचा समावेश आहे. या योजना पूर्णत्वास  गेल्यानंतर जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्यास मदत मिळेल, असे विदर्भ  पाटबंधारे विकास महामंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.-

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadakriनितिन गडकरीbuldhanaबुलडाणा