मोताळा (बुलडाणा) : धामणगाव बढे येथील वाहने जाळपोळ व गावठी बॉम्ब प्रकरणातील मु ख्य सूत्रधार म्हणून फिर्यादीचा भाऊ रियाज अबुबकर पटेल (३२) याला पोलिसांनी बुधवारी ४.३0 वाजता अटक केली. या प्रकरणात मुंबई येथील संगीता पाटील हिला ७ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. सदर महिला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे; मात्र पोलिस त पासात फिर्यादीचा भाऊच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितल्यामुळे, या प्रकरणाला आ ता वेगळे वळण मिळाले आहे. धामणगाव बढे येथील परवेज अबुबकर पटेल यांच्या घरासमोर असलेली स्कार्पियो व दुचाकी वाहनाला आग लावून अज्ञात व्यक्तीने २ जानेवारीच्या रात्री ती जाळली होती. तर त्याच रात्री पटेल यांच्या इमारतीला गावठी बॉम्ब लावून नुकसान करण्याचा प्रयत्न झाला होता. धामणगाव बढे पोलिसांनी या प्रकरणात मुंबई येथील सिनेजगताशी संबधीत संगीता पाटील हिला अटक केली होती. पोलीस तपासात संगीता पाटील या महिलेने सांगितले की, रियाज अबुबकर पटेल हा युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने गावातील काही विरोधकांचा बदला घेऊन, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे प्रकरण त्याने घडवून आणले आहे. या प्रकरणात ग्रामस्थांची सहानुभूती मिळविणे हा त्याचा हेतू होता. धामणगाव बढे येथील गजानन घोंगडे, मंगेश शहाणे, संगीता पाटील व रियाज पटेल यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी खाजगी कारणावरून वाद झाला होता. हा वाद संपुष्टात आल्यानंतर रियाज पटेल याने गजानन घोंगडे व मंगेश शहाणे यांचा बदला घेण्याबरोबरच यातून राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी अजिंठा येथे संगीता पाटील हिला गावठी बॉम्ब दिला होता; मात्र संगीताने वाहनांची जाळपोळ व गावठी बॉम्ब ठेवण्याचे प्रकरण घडवून आणण्यास विरोध केला व ३१ डिसेंबर रोजी हा गावठी बॉम्ब रियाज पटेलला परत दिला होता, असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादीचा भाऊच निघाला मुख्य सूत्रधार
By admin | Updated: February 19, 2015 00:22 IST