शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्तीसाठी लाच घेताना मुख्य लिपिकास पकडले

By सदानंद सिरसाट | Updated: June 12, 2023 20:13 IST

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव.

मलकापूर :मलकापूर शिक्षण समितीच्या मुख्य लिपिकास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली, त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा पथकाने येथील बसस्थानक परिसरातील मंदिरासमोर ही कारवाई केली.

मलकापूर शिक्षण समितीच्या चार संस्थांचा कारभार गोविंद विष्णू महाजन विद्यालयातील मुख्य कार्यालयातून चालतो. त्या ठिकाणी वरिष्ठ लिपिक म्हणून नंदनवन नगरातील विलास उत्तम सोनुने (५२) कार्यरत आहेत. संस्थेचे कामकाज तेच पाहतात, असे सूत्रांनी सांगितले. मलकापूर शिक्षण समितीच्या हिराबाई संचेती कन्या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याचा सन २०१२ साली मृत्यू झाला. तेव्हापासून त्यांचा मुलगा संस्थेत बिनपगारी काम करीत आहे. त्याला सेवेत कायम करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

ती रक्कम द्यायची नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा कार्यालयात तक्रार दाखल केली. पथकाने मलकापुरात सापळा रचला. सोमवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरातील मंदिरासमोरच्या दुकानात तक्रारदाराने मुख्य लिपिक विलास उत्तम सोनोने यांना एक लाख रुपये दिले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, विलास साखरे, विनोद लोखंडे, मो. रिजवान, प्रवीण बैरागी, स्वाती वाणी, गौरव खत्री यांनी केली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावे लाचेची मागणीअनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीला मान्यतेचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे मलकापूर शिक्षण समिती या संस्थेमार्फत सादर करण्यात आला. या प्रस्तावास शिक्षणाधिकारी कार्यालयातून मान्यता मिळवून देण्यासाठी आरोपी सोनुने याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावे २ लाख रुपयांची लाच मागणी करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे या लाचेच्या रकमेत कोण वाटेकरी आहेत, याचा तपास आता लाचलुचपत विभागाकडून केला जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरkhamgaonखामगावBribe Caseलाच प्रकरण