शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

छत्रपती संभाजी राजे सोमवारी बुलडाण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 11:59 IST

Chhatrapati Sambhaji Raje छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जागेचे भुमीपूजन २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा बुलडाण्यात उभारण्यात येणार असून या पुतळ्याच्या जागेचे भुमीपूजन २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पुतळा उभारणीस जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याची माहिती शिव छत्रपती बहुउद्देशीय स्मारक समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच समितीचे अध्यक्ष टी. डी. अंभोरे पाटील यांनी दिली.या पत्रकार परिषदेस समितीचे कार्याध्यक्ष आ. संजय गायकवाड, उपाध्यक्ष राजेश हेलगे, प्रा. सुभाष मानकर, ॲड. जयश्री शेळके, , डॉ. राजेश्वर उबरंहडे, मंगेश बिडवे, नितीन राऊत यांच्यासह अन्य उपस्थित होते.या अश्वारूढ पुतळ्याच्या पायाभरणी प्रसंगी हाेणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री यशाेमती ठाकूर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, जि.प.अध्यक्षा मनिषा पवार यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  पंचधातूचा हा आकर्षक असा अश्वारूढ पुतळा राहणार असून यासाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत  आल्याचेही अंभोरे यांनी सांगितले.दुसरीकडे संगमचौकात बसस्थानकामधील व्यापारी गाळ्यांसमोरील खुल्या जागेत हा पुतळा उभारण्यात येणार असून त्याच्या लगत असलेल्या वीज वाहिन्या या भूमिगत करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असून, त्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, या अश्वारूढ पुतळ्यासोबतच आठ घोडे व त्यावर मावळे, दोन हत्ती आणि पुरातन किल्ल्याचा आकर्षक असा देखावाही येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती आ.संजय गायकवाड यांनी सांगितले. सोबतच पुतळा परिसराची स्वच्छता आणि देखभालीसाठी येथे दोन सेवाधारीही ठेवण्यास प्राधान्य राहणार असल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती