शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घाटाखालील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:25 IST

काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना आता स्वपक्षातील दुसºया फळीच्या नेत्यांचा सामना केल्यानंतरच निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

- अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: आगामी विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून काँग्रसने उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी ५ जुलैपर्यंत मुदत दिली होती. पक्ष नेतृत्वाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, दुसºया फळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनीही उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना आता स्वपक्षातील दुसºया फळीच्या नेत्यांचा सामना केल्यानंतरच निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या दारूण पराभवाचा धडा घेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाच्या नेत्रूांचा शोध सुरू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोद या मतदार संघात पराभूत झालेल्या नेत्यांसोबतच, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या उद्देशाने कॉग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सामान्य कार्यकर्ता ते दुसºया फळीतील नेतृत्व, संघटनात्मक पदाधिकारी यांना उमेदवारी अर्ज सादर करण्याची संधी पक्षाने दिली होती. या संधीला प्रतिसाद देत, घाटाखालील दुसºया फळीतील नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केलेत. परिणामी, आता काँग्रेस पक्षाकडून आपलीच उमेदवारी निश्चित असलेल्या पराभूत आणि मातब्बर नेत्यांना पक्षातंर्गतच आव्हान उभे ठाकले आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिलेल्या काही उमेदवारांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. थोड्याफार फरकाने कर्नाटकयेथेही हा प्रकार घडला. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होवू नये, यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. दगाफटका झाल्यास, दुसºया फळीचा पर्याय पक्षनेतृत्वाकडून तयार ठेवल्या जात आहे.या मतदारसंघात उभे राहील आव्हानखामगाव मतदार संघात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांनी आव्हान दिले आहे. पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे अमरावती विभागीय सरचिटणीस धनंजय देशमुख यांचाही पर्याय म्हणून विचार होवू शकतो.मलकापूर मतदार संघात डॉ. अरविंद कोलते यांना अ‍ॅड. हरिश रावळ, नारायण निहलाणी, राजू पाटील आणि राजेश एकडे यांनी आव्हान उभं केले आहे. राजेश एकडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा मलकापूर विधानसभा मतदार संघात सुरू आहे.जळगाव जामोद मतदार संघात काँग्रेसनेते रामविजय बुरूंगले यांना पर्याय म्हणून प्रसेनजीत पाटील, ज्ञानेश्वरदादा पाटील, स्वातीताई वाकेकर उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.

मलकापूर, जळगाववर राष्ट्रवादीचा दावा!घाटाखालील तीन विधानसभा मतदार संघापैकी जळगाव जामोद अथवा मलकापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावा, अशी मागणी जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मतदार संघ सुटल्यास मलकापूर मतदार संघातून संतोष रायपुरे तर जळगाव जामोद मतदार संघातून संगीतराव भोंगळ उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Politicsराजकारणkhamgaonखामगावcongressकाँग्रेस