शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपाचे बँकांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 10:59 IST

Crop Loan News : येत्या काळात बँकांना पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील ४१ हजार ६२२ शेतकऱ्यांना ३६९ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून एकूण उदिष्ठाच्या ते ते अवघे २८ टक्के आहे. त्यामुळे येत्या काळात बँकांनापीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे यावर्षी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या सुचनेनुसार गेल्या तीन वर्षाच्या उदिष्ठ पुर्तीच्या सरासरीच्या आधारावर जिल्ह्यास पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ दिलेले आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ मिळालेले आहे. त्यामुळे हे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ बँकांना पुर्ण करावेच लागणार असल्याचे चित्र आहे. कारण गेल्या वर्षी शेतकरी कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठही मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तब्बल ३ लाख ६२ हजार २२८ शेतकऱ्यांना २ हजार ४६० कोटी ३५ लाख रुपयांचे उदिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी ४२ टक्के शेतकऱ्यांना ५१ टक्के पीक कर्जाची रक्कम वाटप करण्यात आली होती.यंदा पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठच कमी झाल्यामुळे बँकांकडून उदिष्ठाची पुर्तता करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रयत्न होण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनीही गेल्या आठवड्यात बँकांकडून नेमके किती उदिष्ठ पुर्ण झाले याचा आढावा घेतला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलडाण्यात आले असता या मुद्द्यावर त्यांनी आ. हर्षवर्धन सपकाळांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. दुसरीकडे दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ जुलै पर्यंत बँकांनी शेतकऱ्यांना खरीपासाठीचा पीक कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता उपरोक्त बाब स्पष्ट झाली.

२० दिवसात १३६ कोटी वाटपबँकांनी पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्यासंदर्भात हालचाली कराव्यात, अशा सुचनाही अग्रणी बँकेकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने गेल्या २० दिवसात १५ हजार १३६ शेतकऱ्यांना १३६ कोटी २४ लाख रुपयांचे बँकांनी कर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यात ४१ हजार ६२२ शेतकऱ्यांना ३६९ काेटी ५२ लाख रूपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दीष्टाच्या ३० टक्के शेतकऱ्यांच्या हातात पिक कर्जाची रक्कम पडली आहे. सर्व शेतकऱ्यांना पिककर्ज मिळले, या दृष्टीने आमचे नियाेजन असून पिककर्ज वाटपाचा वेगही वाढत आहे.- नरेश हेडाऊ, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बॅंक

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणाbankबँकFarmerशेतकरी